*तीन सिंहा बरोबर.... युवकांनी घेतली आघाडी.., पाणी आणणे आता हीच धडाडी.....!* *करकंब च्या गाव पाझर तलावात व पूर्व भागात पाणी आणण्याचे स्वप्न होणार साकार*.

*तीन सिंहा बरोबर.... युवकांनी घेतली आघाडी.., पाणी आणणे आता हीच धडाडी.....!* *करकंब च्या गाव पाझर तलावात व पूर्व भागात पाणी आणण्याचे स्वप्न होणार साकार*.

 करकंब /प्रतिनिधी

: गेल्या अनेक दिवसापासून करकंब येथील गाव पाजर तलाव आणि करकंब चा दुष्काळग्रस्त असलेला पूर्वभाग याबाबत करकंब सह राज्यभरात याची चर्चा केली जात आहे. तरी असो की मळे असो..,. चेहरे मात्र समोर सारखे दिसतात. पण वास्तविकता करकंब च्या पूर्व भागाची दुष्काळजन्य असलेली परिस्थिती त्यातच आपल्याच गावाच्या 42 एकर असलेल्या एवढ्या मोठ्या सुमारे एक ते दीड टीएमसी पाणी साठवण तलाव असलेल्या कोरडा असल्याने याची खंत करकंब येथील युवकांना सतत मनामध्ये खदखदत होती. एक प्रामाणिक हेतू मनामध्ये घेऊन निस्वार्थी भावनेने हे काम करण्याचे एक ते दीड वर्षापूर्वी ठरले, बऱ्याच अडी-अडचणी संघर्ष करीत असतानाही योग्य लोकांची सहकार्य साथ मार्गदर्शन मिळत गेल्याने या युवकांना एक नवीन प्रेरणा मिळत गेली आणि याच प्रेरणेने आज त्यांचे स्वप्न आकार घेत आहे हे करकंब गावासाठी भूषणावह असले तरी इतर राज्यातील गावातील युवक ही आता अशीच प्रेरणा घेऊन करकंब चा नवा पॅटर्न राज्यात निर्माण होऊ लागला आहे.
  करकंब येथील युवकांनी एक दीड वर्षांपूर्वी करकंब हे काम सुरू केले. सत्तर वर्षाच्या काळात अनेक निवडणूका आल्या आणिअनेक निवडणुका गेल्या. नेहमीच पूर्व भागाचा विषय निघत गेला. पण काम कुठलेच पूर्ण झाले नाही. संबंधित ही बाब भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब अंबुरे यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना सांगितली. त्याच वेळी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी या गाव पाझर तलाव व पूर्व भागासाठी स्वतः येऊन पाहणी केली. खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनीही या पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी, गाव पाझर तलावासाठी सकारात्मक भूमिका घेऊन जे जे आवश्यक सहकार्य असेल त्याची तयारी त्यांनी दिली. या बाबी नंतर करकंब येथील अजित सिंह देशमुख व अशोक सिंह देशमुख व त्यांचे सर्वस्व असलेले सहकारी यांनीही लगेचच देशाचे नेते खासदार शरद चंद्र पवार यांच्याशी भेट घेऊन याबाबतची सर्व कल्पना माहिती दिली. त्यानंतर सर्वे झाला. पाणी आणण्याचे स्वप्न साकारही होईल अजून त्यासाठी प्रचंड धडपड हीच करावी तर लागेल. पण या कामासाठी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर, करकंब येथील अजित सिंह देशमुख-अशोक सिंह देशमुख या तीन सिंहां बरोबर प्राध्यापक मिथुन चंदनशिवे, महेश गुजरे , रामभाऊ सलगर, नितीन दुधाळ, डॉक्टर बळीराम चव्हाण, शैलेश जवारे , संतोष शिंदे, अनिल धोत्रे, अमोल चेडे, अभिजीत आंबुरे, धनाजी लोकरे, अभिजीत आंबुरे, सत्यवान व्यवहारे हनुमंत भंडारे युवकांनी आघाडी घेतली असून यापुढे आता करकंब च्या पूर्व भागात व गाव पाझर तलावात पाणी आणून करकंब करांचे स्वप्न साकार हे युवक निश्चित करणार असल्याचे सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे.