*करकंब येथे 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा*

*करकंब येथे 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा*

करकंब/ प्रतिनिधी:
       करकंब येथील केंद्रस्तरीय मतदार नोंदणी अधिकारी(BLO) कर्मचारी यांच्या वतीने करकंब ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय मतदार दिवस सर्वाना मतदार नोंदणी करण्याचे प्रतिज्ञा देवून साजरा करण्यात आले.
        करकंब बी.एल.ओ.सुपरवायझर बोरे सर यांच्या मार्गदर्शनातून करकंब ग्रामपंचायत उपसरपंच आदिनाथ देशमुख यांच्या उपस्थितीत मतदार जागृती अभियान व प्रतिज्ञा वाचन करून राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आले.  
   यावेळी प्रतिज्ञा वाचन अविनाश देवकते यांनी केले.या कार्यक्रमास करकंब ग्रामपंचायत सदस्य बापू शिंदे,पत्रकार शहाजी काळे,करकंब केंद्रप्रमुख अप्पासाहेब माळी,बी.एल.ओ.शंकर गायकवाड,नागन्नाथ घाटुळे,गहिनीनाथ व्यवहारे,महादेव पुजारी,परमेश्वर धोत्रे,भागवत पलंगे,विशाल देशमुख,बाबर नाना, ग्रामपंचायत कर्मचारी  व ग्रामस्थ उपस्थित होते.