*सोलापुरात महापालिका प्रधानमंत्री आवास योजना कार्यालयात मोठा भ्रष्टाचार ; अशी झाली फसवणूक, नागरिकांनों सावधान*

*सोलापुरात महापालिका प्रधानमंत्री आवास योजना कार्यालयात मोठा भ्रष्टाचार ; अशी झाली फसवणूक, नागरिकांनों सावधान*


सोलापूर /विशेष प्रतिनिधी :
प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळवून देण्याचे अमिष दाखवून सोलापूर महानगरपालिकेची पैसे भरणा केलेल्या सही व शिक्याची बनावट पावत्या, प्रधानमंत्री आवास योजनेचा भरण्यात आलेला फॉर्म व लाभार्थी मंजुरीचे छायांकित पत्र अशी शासकीय महत्वाची बनावट कागदपत्रे तयार करून शहरातील 4 जणांची तब्बल 6 लाख 14 हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी प्रधानमंत्री आवास योजना कार्यालयातील कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौराप्पा तुकाराम गायकवाड, वय ४२ वर्षे, व्यवसाय नोकरी. रा. घर नं. १३३ घरकुल लगत, सिध्दार्थ नगर, कुमठेगाव, ता. उत्तर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहित शिवाजी चव्हाण, रा. सुरवसे नगर कुमठा नाका, सोलापूर व सोलापुर महानगरपालिका येथील तत्कालीन संबंधित स्टाफ व इतर व्यक्ती यांच्या विरोधात भादविसक ४०६,४२०,४६५४६६, ४६७, ४६८, ४७१, १७० १७१३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
ऑक्टोबर २०१६ मध्ये फिर्यादीस प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मिळणार आहे अशी माहिती मिळाल्यामुळे माहिती घेण्याकरीत फिर्यादी हे वरील ठिकाणी गेले असता, तेथील कार्यालयामध्ये एक इसमाने फिर्यादीस माहिती सांगितली. त्यामध्ये ८ लाख रुपये कर्ज देण्यात येते. ज्याचे परतफेडीचे वार्षीक ६.५ टक्के व्याज आहे. तसेच २ लाख ६७ हजार रुपये सबसिडी देखील मिळणार आहे. परंतु त्यामध्ये तुमच्या हिश्याची काही रक्कम व प्रोसेसिंग फी स्टॅम्प डयुटी, मॉरगेज फॉर्म इत्यादी करीता साधारण १.५०,०००/- रु रक्कम भरणा करावी लागेल सदर रक्कमेचा भरणा केल्याची सोलापूर महानगरपालिकेची पावती तुम्हाला दिली जाईल व सर्व प्रोसिजर झाल्यानंतर फिर्यादीचे खात्यावर ८ लाख रुपये जमा होतील असे सांगितले. फिर्यादीने वेळोवेळी करून १,३३,०००/- रु भरणा वरील ठिकाणी केला आहे. त्याचप्रमाणे फिर्यादीचे नातेवाईक १) भारत ज्ञानदेव सुरवसे यांनी प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत कर्ज मंजुरीसाठी १,७०,०००/- रु आरोपी क्रं. १ याचे कडे भरणा केला आहे. २) दत्तात्रय नागनाथ आठवले यांनी देखील १,३१,०००/- रु आरोपी क्रं. १ याचे कडे भरणा केला आहे. ३) शब्बीर दस्तगीर तांबोळी यांनी देखील १,८२,४००/ रु आरोपी क्रं. १ याचे कडे भरणा केला आहे. यातील वरील आरोपीतांनी संगणमत करुन सदर कर्ज प्रकरणात शासकीय प्रोसेसिंग फीचे कारणास्तव फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांकडुन एकुण ६,१४,४००/- रु घेवुन त्याचप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेची पैसे भरणा केलेल्या सही व शिक्याची बनावट पावत्या, प्रधानमंत्री आवास योजनेचा भरण्यात आलेला फॉर्म व लाभार्थी मंजुरीचे छायांकित पत्र अशी शासकीय महत्वाची बनावट कागदपत्रे देवून एकुण ६,१४,४००/- रुपये रक्कमेचा अपहार करुन फिर्यादीची व इतरांची फसवणुक केली आहे.