*पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी सेविकांसह मुलांचा होणार सन्मान* *भाजप पंढरपूर तालुका ग्रामीणच्या वतीने सेवा सप्ताह निमित्त बुधवारी उपक्रम* 

*पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी सेविकांसह मुलांचा होणार सन्मान*  *भाजप पंढरपूर तालुका ग्रामीणच्या वतीने सेवा सप्ताह निमित्त बुधवारी उपक्रम* 

पंढरपूर /प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या पंढरपूर तालुका ग्रामीणच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी सक्रीय रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष मस्के यांनी केले आहे.

या राबविण्यात येत असलेल्या सेवा सप्ताह मधून  बुधवारी सकाळी मुंडेवाडी, गोपाळपूर, तावशी, रांझणी, कासेगाव, अनवली, शेटफळ, खर्डी, तनाळी, बोहाळी, शिरढोण, कौठाळी एकलासपूर, शिरगाव, सिध्देवाडी, लक्ष्मी टाकळी गादेगाव, कोर्टी ता. पंढरपूर येथील सर्व स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांनी अंगणवाडी सेविकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तसेच याच गावातील अंगणवाडी शाळेत येणाऱ्या छोट्या मुलांना फळे व मिठाई वाटप करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष मस्के यांनी दिली आहे.