*प्रहार अपंग क्रांती संघटनेचा चक्री उपोषणाचा इशारा....!* *करकंब चे दिव्यांग बसणार चक्री उपोषणाला...*

*प्रहार अपंग क्रांती संघटनेचा चक्री उपोषणाचा इशारा....!* *करकंब चे दिव्यांग बसणार चक्री उपोषणाला...*

करकंब /प्रतिनिधी:-

सन 2021 -22 (२० टक्के) समाज कल्याण,व. ५ टक्के दिव्यांग योजनेतील दिव्यांग लाभार्थी चे यादी मध्ये नाव समाविष्ट न करता या योजनेत इतर लोकांचा समावेश केल्यामुळे याबाबत त्रुटी आढळून आल्याचे निदर्शनास आल्याने प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने पंढरपूर पंचायत समिती कार्यालयासमोर पंढरपूर येथे बुधवार दिनांक 27/4/2024 चक्री उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
या लाभार्थी यादी मध्ये दिव्यांग सोडून इतर लोकांचा समावेश केल्यामुळे प्रहार अपंग संघटनेला आंदोलन करण्याची वेळ आली असून सदरच्या आंदोलनाचे निवेदनाची प्रत गट विकास अधिकारी पंचायत समिती पंढरपूर, यांना करकंब शाखाध्यक्ष महेंद्र लोंढे, शाखा सचिव बाळू पेटकर यांनी नुकतीच दिली आहे. यावेळी करकंब येथील बहुसंख्य दिव्यांग उपस्थित होते.