*सत्यासाठी संघर्ष करणाऱ्या  राज ठाकरे यांनाच जनतेतून मिळणार कौल* *आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या  मोडनिंब येथील बैठकीत मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांचा विश्वास*

*सत्यासाठी संघर्ष करणाऱ्या  राज ठाकरे यांनाच जनतेतून मिळणार कौल*  *आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या  मोडनिंब येथील बैठकीत मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांचा विश्वास*

मोडनिंब/प्रतिनीधी 

माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावावे. सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये कोणत्याच पक्षाबद्दल विश्वासार्हता राहिलेली नसून, लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्यास, दोन्ही निवडणुका लढवण्याची तयारी करण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते  दिलीप धोत्रे यांनी केले आहे.

मोडनिंब येथे माढा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत  पदाधिकाऱ्यांना  सांगितले.
यावेळी धोत्रे म्हणाले की, सध्या महाराष्ट्रातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजपा, शिवसेना शिंदे गट, या सर्व पक्षांबद्दल सर्व सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली असून केवळ राज ठाकरे हेच एकमेव महाराष्ट्राचे विश्वासू नेते असून सत्यासाठी संघर्ष करणारा व खरे बोलणारा एकमेव नेता म्हणून, राज ठाकरे यांच्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेला विश्वास असल्याचे यावेळी सांगितले.
   यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष प्रत्येक गावामध्ये जाऊन संपर्क वाढवणे गरजेचे असल्याचे सांगितले, यावेळी धैर्यशील पाटील, अप्पा करचे याचेसह माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुकाध्यक्षांनी आपली मनोगत व्यक्त केले.  मनसेने पक्षाचे चिन्हावर माढा लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लढवाव्यात असा आग्रह केला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.