*शासन स्तरावरून शेळवे येथील कासाळगंगा पूलाची उंची वाढवण्याचे हालचाली सुरू* *शेळवे चे पोलीस पाटील अँड.नवनाथ पाटील यांनी केली होती मागणी*

पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील शेळवे कासाळगंगा ओढ्यावर पाणी वाढते. त्यामुळे या भागातील दळणवळण ठप्प होत असते. यामुळे शेळवे गावचे पोलीस पाटील नवनाथ पाटील यांनी सदरच्या पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत प्रशासनाकडून फुलाची उंची वाढवण्याच्या हालचाली सुरू असून प्रशासनाकडून पाहणीही करण्यात आली आहे.
उजनी धरणावरील पाणलोट क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यानंतर पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात येते. तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडल्यानंतर पूर नियंत्रणासाठी वीर धरणातूनही नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यात येते. त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ होते . भीमा नदीच्या बॅक वॉटर मुळे तसेच कासाळगंगा पाणलोट क्षेत्रामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्यानंतरही ,पंढरपूर पुणे जुना पालखी मार्ग शेळवे येथील कासाळगंगा पुलावरती नेहमीच पाणी येते. व त्यामुळे तो पूल वाहतुकीसाठी बंद करावा लागतो त्यामुळे शेळवे ,वाडीकुरोली ,पिराची कुरोली ,पटवर्धन कुरोली, नांदोरे, देवडे, खेड भाळवणी, भडीशेगाव, अशा अनेक गावातील शेतकऱ्यांचे त्या पुलावरील वाहतूक बंद झाल्यानंतर प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होते. तसेच या भागात अनेक शिक्षण संस्था ही आहेत .त्यामुळे विद्यार्थ्यांची ही शैक्षणिक नुकसान होते .तरी त्या पुलाची अत्यावश्यक उंची वाढवावी .अशा पद्धतीची मागणी शेळवे गावचे पोलीस पाटील नवनाथ पाटील यांनी केलेली होती . या बातमीची दखल घेत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या पुलाची उंची वाढवण्याबाबत पाहणी केलेली आहे. यामुळे हा प्रश्न लवकर मिटणार असल्याने पोलिस पाटील नवनाथ पाटील यांचे आभार व्यक्त होत आहे.