*करकंब येथे सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने  शिवजयंती साजरी*

*करकंब येथे सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने  शिवजयंती साजरी*


*करकंब/ प्रतिनिधी*

सालाबाद प्रमाणे याही वर्षी करकंब येथील सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान एसटी स्टँड करकंब यांच्या वतीने भव्य शिवजयंती सोहळ्याचे आयोजन दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता शिव प्रतिमेच्या पूजनाने संपन्न होणार आहे.*
*या सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान मंडळाच्या शिव प्रतिमेचे पूजन करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु व डॉक्टर सचिन लवटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले . यावेळी कोरोना विषाणू च्या काळामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या करकंब पोलीस ठाण्याचे अधिकारी व त्यांचे सहकारी तसेच करकंब ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक तसेच सर्व टीम आशा वर्कर व जागर स्वच्छता अभियान टीम या सर्वांचा सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने विशेष सन्मान व सत्कार केला . तसेच या प्रतिष्ठान च्या वतीने यावर्षी रक्तदान शिबिर कोरणा विश्वनाथ संदर्भात लसीकरण मोहीम याबाबत करकम आणि करकम परिसरामध्ये जनजागृती करण्याचे या शिवजयंतीच्या निमित्ताने केले. यावेळी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सदस्य,शिवप्रेमी, शिवभक्त, आणि ग्रामस्थ उपस्थित बहुसंख्येने उपस्थित होते.*