*मुरघास लय खास :- कृषिदूत रोहित कदम*

पंढरपूर:प्रतिनिधी
मुरघास म्हणजे मुरलेला चारा (घास). अगदी आपल्या मुरांबा किंवा मोरावळ्या सारखा. हिरवा चारा त्याच्या पौष्टिक अवस्थेत असताना त्यातील अन्नघटकांचा नाश ना होऊ देता किमान ४५ दिवस हवाबंद करून वेगवेगळ्या मार्गांनी साठवून ठेवणे म्हणजे मुरघास होय असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित,रत्नाई कृषी महाविद्यालय,अकलूज आयोजित ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत कृषिदुत रोहित कालिदास कदम याने मांडले.
मुरघास म्हणजे हवा विरहित जागेत किण्वनीकरण (आंबवून) करून साठवलेला चारा होय. या पद्धतीत हवा विरहित अवस्थेमध्ये जगणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंमुळे हिरव्या वैरणीत असलेल्या साखरेपासून लॅक्टिक आम्ल तयार होतो. हे आम्ल चारा चांगल्या अवस्थेत ठेवण्याचे काम करते. हिरवा चारा कापून जेव्हा खड्ड्यात भरला जातो. तेव्हा वनस्पतीच्या पेशी जिवंत असतात व त्यांचा श्वासोच्छ्वास चालू असतो. त्यामुळे पाणी व कार्बनडायऑक्साइड तयार होतात. तसेच चारा दाबून भरल्यामुळे खूप उष्णताही निर्माण होते. व खड्ड्यातील हवाही निघून जाते. त्यामुळे हवेत जगणारे जीवाणू तेथे टिकू शकत नसल्याने चारा खराब न होता तो टिकून राहतो.ते करत असताना त्यांनी मुरघासासाठी घ्यावयाची पिके,मुरघासाचे फायदे ,मुरघास तयार करण्याची पद्धत इत्यादी बद्दल सविस्तर माहिती कृषीदुत रोहित कदम याने दिली.त्याकरिता अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील,रत्नाई कृषी महावद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी.कोरटकर, प्राचार्य आर.जी. नलवडे, प्रा.एस. एम. एकतपुरे, प्रा. एस. आर. आडत,प्रा. डी. एस. मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले.