*श्री संत नामदेव पायरीचे काँग्रेसकडून शुद्धीकरण* 

*श्री संत नामदेव पायरीचे काँग्रेसकडून शुद्धीकरण* 

पंढरपूर:-प्रतिनिधी

मंदिरे उघडण्याची मागणी करत भाजपा कार्यकर्त्यांनी , नामदेव पायरी समोर आंदोलन केले या आंदोलनादरम्यान धुडगूस घालत या समाधी स्थळाचे पावित्र्यही जपले नाही अशा या पवित्र ठिकाणचे शुद्धीकरण करण्याचे काम येथील काँग्रेस  पक्षाकडून बुधवारी करण्यात आले.
    वारकरी संप्रदायात विठोबा माऊली नंतर संत नामदेव महाराज सहकुटुंब समाधी पवित्र मानले जाते. अशा पवित्र स्थळाला वारकरी आधी नामदेव पायरी असे म्हणतात. पुर्वी त्या स्थाळाला नमस्कार करून पाय न लागू देता मंदिरात प्रवेश करायचे, अशा पवित्र स्थानांमध्ये भाजपचे टवाळखोर कार्यकर्तानीं चपला व बूट घालून कठडे ओलांडुन धुडगूस घातला. मीडियावर झळकण्यासाठी टवाळखोर कार्यकर्त्यांनी मोदी अंध भक्तांनी संत नामदेव महाराज पायरीवर चपला बूटा सहित भान विसरून, ज्या ठिकाणी  विठोबा रुक्मिणी व नामदेव तुकारामांच्या नावाचा जयघोष घुमतो, अशा ठिकाणी वारकऱ्यांच्या भगव्या झेंड्याच्या ऐवजी, भाजप चिन्ह असलेले झेंडे घेऊन, घोषणा देत धुडगुस घातला व श्री विठ्ठल मंदीराच्या प्रवेशद्वारावर झेंडे फडकले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व नामदेव पायरी पवित्र स्थळाचे पावित्र्य भंग करणाऱ्या व वारकरी संप्रदायाच्या सर्व भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. 
   या साठी आज काॅग्रेस पक्षा कडुन श्री संत नामदेव महाराज पायरी व मंदीर परीसर पंचामृताने व गोमुत्राने शुधीकरण करण्यात आले.भाजप पक्षाच्या अध्यक्षने आणि आमदाराने जाहीर माफी मागावी अन्यथा सोलापूर ओबीसी विभाग व सर्व काँग्रेस कार्यकर्ते तीव्र आंदोलन करतील
या वेळी  सोलापूर जिल्हा ओबिसी सेल अध्यक्ष काँग्रेस समिर कोळी,युवक जिल्हा कार्याध्यक्ष शंकर सुरवसे, जिल्हा सरचिटणीस हणमंत मोरे, अल्पसंख्यक शहर अध्यक्ष अशपाक सय्यद, युवक कार्याध्यक्ष सागर कदम, मा.शहर अध्यक्ष सुहास भाळवणकर, शहर सरचिटणीस मिलिंद अढवळकर, बाळासाहेब आसबे, भाऊ तेलंग व सर्व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.