*गार्डी येथील रेशन दुकानदाराने फासला अन्न सुरक्षा कायद्यास हरताळ* *अन्न सुरक्षा यादीतील अपात्र लोकांची माहिती देण्यास जाणूनबुजून टाळलं* *चौकशी करून कारवाईची आर. आर. पाटील लोकविकास प्रतिष्ठानची मागणी*

पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील गार्डी येथील स्वस्त धान्य दुकानदार शरद पवार ,यांनी अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केले आहे. महसूल प्रशासनास अन्नपुरवठा यादी चुकीच्या पद्धतीने देऊन, प्रशासनाची तसेच सामान्य लाभधारकांचीही फसवणूक केली आहे . संबंधित रेशन दुकानदाराची चौकशी करून, तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आर. आर .पाटील लोकविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांनी अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.
र्डी येथील स्वस्त धान्य दुकान शरद पवार हे चालवीत आहेत. हे दुकान चालवीत असताना त्यांनी महसूल प्रशासनास झोल दिला आहे . गेल्या सात ते आठ वर्षांपासून त्यांनी चुकीच्या पद्धतीने अन्नपुरवठा यादी महसूल प्रशासनाकडे दिली आहे .रुपये ४०'००० पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या अनेक बड्या मंडळींची नावे ,अन्नपुरवठा यादीत घुसवली आहेत .
यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कुचंबना झाली आहे. संबंधित रेशन दुकानदाराने महसूल प्रशासनाची तसेच सामान्य नागरिकांचीही फसवणूक केली आहे . यामुळे संबंधित रेशन दुकानचालकाच्या अन्नपुरवठा यादी रजिस्टरची तपासणी केल्यास ,.हे सत्य उघड होणार आहे. यामुळे सदर रेशन दुकान चालकाची चौकशी करून, तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी ,अशी मागणी आर. आर. पाटील लोकविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांनी अन्नपुरवठा मंत्र्यांकडे केली आहे.
चौकट
राज्यातील अन्न पुरवठा विभागात गोंधळ असल्याचे प्रकार कायमच समोर येत आहेत. नागरिकांना करण्यात येणार्या अन्नपुरवठयाबाबत कायमच आक्षेप नोंदविले जात आहेत. एखाद्या रेशन दुकानदाराने अन्नपुरवठा यादीच चुकीची द्यावी, आणि त्यातून आपला कार्यभाग साधावा. असा प्रकार गार्डी येथील रेशन दुकानात घडत असल्याची तक्रार , दादासाहेब चव्हाण यांनी राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.