*करकंब-मोडनिंब रस्ता बनला मृत्यूचा सापळा*  *ठेकेदाराच्या तालावर... बांधकाम विभाग नाचतोय... ग्रामस्थ प्रवासी वाहनधारक मात्र.... जीवघेणा प्रवास करतोय.....!* *निकृष्ट  दर्जाच्या कामामुळे लोकांमधून तीव्र संतापाची लाट*

*करकंब-मोडनिंब रस्ता बनला मृत्यूचा सापळा*   *ठेकेदाराच्या तालावर... बांधकाम विभाग नाचतोय... ग्रामस्थ प्रवासी वाहनधारक मात्र.... जीवघेणा प्रवास करतोय.....!* *निकृष्ट  दर्जाच्या कामामुळे लोकांमधून तीव्र संतापाची लाट*


करकंब /प्रतिनिधी:

-करकंब-मोडनिंब या रोडवरील नवरा नवरी ते शंकर नगर (करकंब चौक) या रस्त्याचे सध्या काम जोरात सुरू आहे. हे काम करकंब येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्या अंतर्गत संबंधित ठेकेदाराने सुरूकेले आहे. मागील काही दिवसापासून काम चालू केल्यापासून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे सर्वसामान्य लोकांच्या येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या व वाहन दारात धारकांच्या लक्षात येत असूनही याकडे या सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे संबंधित अधिकारी व ठेकेदार जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असून हे काम अतिशय निकृष्ट सुरु असतानाही हे काम कशा पद्धतीने चांगले आहे सांगण्याच्या प्रयत्न संबंधित अधिकारी ठेकेदाराला साथ देऊन संगनमत करीत असल्याचे चित्र दिसून येत असल्याने ठेकेदाराच्या तालावर.. करकंब येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग नाचतोय... आणि करकंब व या परिसरातील ग्रामस्थ प्रवासी वाहनधारक शेतकरीवर्ग मात्र... जीवघेणा प्रवास करतोय... अशी अवस्था निगरगट्ट ठेकेदाराने केल्यामुळे अशा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या परिसरातील लोकांमधून संतापाची लाट उसळली आहे.
करकंब चौक ते मोडनिंब चौक ते मोडनिंब मार्गे हा रस्ता असून या रस्त्यावरून करकंब मार्गे सोलापूरला जवळचा नियोजित राज्य मार्ग असून हाच महत्वाचा व मुख्य रस्ता दळणवळणासाठी वाहतुकीसाठी तसेच शासकीय कामकाजासाठी शालेय, वैद्यकीय ,शेती विषयक, इतर विविध कामासाठी हा अत्यंत जवळचा मार्ग असल्याने हा रस्ता अत्यंत गुणवत्ता व कॉलिटी चा करणे गरजेचे असताना ठेकेदार मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या रस्त्याचे थातूरमातूर काम करून आणि त्यास संबंधित अधिकारी समोर उभा असूनही निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचे चित्र दिसून येत असल्याने पुन्हा पहिले पाढे पंचावन्न यादृष्टीने कोट्यावधी रुपयांची लूट या रस्त्याच्या माध्यमातून संबंधित ठेकेदार व अधिकारी संगनमताने करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे
याच ठेकेदाराने गेल्या चार पाच महिन्यापूर्वी याच रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे अतिशय निकृष्ट पणे  काम करून शासनाची लूट केली .आता तेच काम याच ठेकेदाराकडे पुन्हा दिल्याने अजून या रस्त्याची अवस्था तीन महिन्यांनी संबंधित ठेकेदाराला हा रस्ता कुठे आहे ? विचारण्याची वेळ ग्रामस्थांवर येणार असल्याने  या रस्त्याबाबत  निवेदन, आंदोलनाचा  इशारा , वैयक्तिक संबंधित अधिकारी यांच्याशी गाठीभेटी घेऊनही या मुख्य सोलापूर ला जाणाऱ्या रस्त्याची मात्र प्रचंड दुरावस्था केवळ ठेकेदार संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यामुळे झाल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
 आमदार - खासदार लोकप्रतिनिधी या नात्याने आपापल्या मतदारसंघातल्या लोकांच्या सोयीसाठी चांगल्या दर्जाच्या रस्त्याच्या निर्मिती व्हावी. या रस्त्यावरून जाताना रस्त्यावरून जाताना अपघाताचे प्रमाण कमी व्हावे. रस्ता सुखकर व सुलभ व्हावा. या उदात्त हेतूने कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून देत असतात . मात्र ठेकेदार आणि संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी संगनमताने या रस्त्यांची विल्हेवाट लावून मोकळे होतात. सामान्य ग्रामस्थ प्रवाशी वाहनधारक सर्वसामान्य लोकांना मात्र प्रत्येक वेळी या बाबी आमदारांच्या जवळ सांगाव्या लागतात. त्यामुळे आमदारांच्या जवळ काय रे रडता... तीन महिन्यांनी ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारा कुठे आहे कोट्यावधींचा रस्ता... अशी चर्चाही या भागातून सुरू आहे. बरेच ठेकेदार हे आमदारासी निगडीत व आमदारांचे बगलबच्चे असल्याची चर्चा आहे. अशा जीवघेणे रस्ते बनवणाऱ्या ठेकेदारांची सावली आमदार - खासदार पाडून घेणार का ? असे सर्वसामान्य लोकातून बोलले जात आहे. शेवटी काय आमदार - खासदार हे सर्वसामान्य जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत... लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा बेजबाबदार ठेकेदार व संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे लोकप्रतिनिधी नाहीत... असे सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे .