*जोशी बंधू पिढ्यानपिढ्या श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी निमित्त जपतायेत धार्मिक वारसा.....!*

करकम्ब/प्रतिनिधी
*करकंब येथील श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी उत्सव सुरुवात.*
करकंब प्रतिनिधी:- टिळक चौक येथील जोशी बंधू यांचे राम मंदिरात रामनवमी ऊत्सवास सुरुवात झाली असून या श्रीराम नवमी निमित्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जोशी बंधू यांनी दिली आहे.दि.2 एप्रिल ते 11 एप्रिल 2022 पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे हा श्री राम नवमी धार्मिक सोहळा संपन्न होणार आहे.दि 2 एप्रिल शनिवार गुढीपाडवा ध्वजारोहण नवरात्र प्रारंभ श्री रामविजय ग्रंथ वाचन दररोज सकाळी 9 ते 12 व दुपारी 3 ते 5. , दि .5 एप्रिल मंगळवार किर्तनकार ह.भ.प. महादेव जगन्नाथ जाधव यांचे किर्तन संध्याकाळी 7 ते 9 आणी जागर श्री. लक्ष्मीनारायण भजनी मंडळ सांगवी. 9 ते 10. दिनांक 6.4.2022 बुधवार स्थानिक भजनी मंडळ बार्डी. रात्री 7 ते 9
दि. 7.4.2022 गुरुवार जयंतराव मराठे व .संजिवनी मराठे यांचे एकदिवशीय मुखोद् गत गजानन विजय ग्रंथाचे पारायण सकाळी 7 ते 10 व दुपारी 11ते 2 नंतर नेवैद्य व प्रसाद.(ज्या गजानन भक्तांची पारायणास बसण्याची इच्छा असेल त्यांनी खालील फोनवर 6 तारखे पर्यंत संपर्क साधावा.) दि.8 एप्रिल 2022 शुक्रवार संध्याकाळी 5 ते 7 स्थानिक महिला मंडळ भजन. दि. 9 एप्रिल 2022 शनिवार कौसल्या मातेचे डोहाळ जेवण समारंभ संध्याकाळी 5 ते 6 रात्री स्थानिक भजनी मंडळाचे भजन. दि.10 एप्रिल 2022 रविवार रामजन्मोत्सव ह. भ. प. श्रीकांत महाराज आरोळे यांचे रामजन्मावर किर्तन स्काळी 11ते 12.30 पर्यंत. नंतर प्रसाद वाटप. दि. 11 एप्रिल 2022 सोमवार श्री.प्रभूरामचंद्रास पवमान अभिषेक. महानैवेद्य ने हा धार्मिक सोहळा संपन्न होणार आहे.