*प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय उपशाखा गणपती नगर, टाकळी रोड, पंढरपूर येथे महिला दिन उत्साहात साजरा*

*प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय उपशाखा गणपती नगर, टाकळी रोड, पंढरपूर येथे महिला दिन उत्साहात साजरा*

पंढरपूर/प्रतिनिधी
       ब्रह्माकुमारीज् संस्थेने भारताच्या स्वातंत्र्याच्या "अमृत महोत्सवा कडून स्वर्णिम भारताकडे" या विषयावर विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. याच धरतीवर ब्रह्माकुमारी उपशाखा गणपती नगर, पंढरपूर येथे 8 मार्च जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रातील कार्यकर्त्या महिला उपस्थित होत्या आरती ताई बसवंती (शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष), मंजू गदगे (कलाकार), डॉक्टर ज्योती गवळी (योगा शिक्षिका) शुभांगी भूईटे (समाजसेविका), डॉक्टर बोधले मॅडम रत्नप्रभा पाटील (लेखिका व कवयित्री), किरण शेटे (माजी शिक्षक केंद्रप्रमुख), दुर्गाताई माने ,टाकळी सरपंच, माजी सरपंच नूतन रसाळ ,सुनंदा सुरवसे (आरोग्य सहाईका) कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने द्वारे सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे महिलांच्या हस्ते करण्यात आले व ध्वजारोहण केले.
यावेळी करकंब शाखेच्या संचालिका ब्रह्माकुमारी अनिता दीदी यांनी उपस्थित महिलांना हसत-खेळत रमनिकतेत महिलांनी न घाबरता सशक्त कसे बनायचे यावर मार्गदर्शन केले तसेच ब्रह्माकुमारी उज्वला दीदी पंढरपूर शाखेच्या संचालिका यांनी महिलांना सशक्त बनविण्यासाठी ईश्वरीय शक्ती कशी काम करते हे सांगून राजयोग अनुभूती करून घेतली. उपस्थित महिला द्वारे नारे बाजी केली. ' नारी ले जिम्मेवारी तो बदले दुनिया सारी'. कुमारी गायत्री यांनी जन जन का कल्याण करेगी शिव की शक्ती नारी या गीतावर नृत्य प्रस्तुत केले व कुमारी ईश्वरी हिने देशभक्तीवर नृत्य प्रस्तुत केले यावेळी तीन कलर भारताचा झेंडा (पांढरा ,हिरवा, केशरी) अशा कलरच्या साड्या घालून माता उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी स्वाती दीदी यांनी केले. आरती ताई बसवंती यांनी आपले विचार व्यक्त करत असताना म्हणाल्या या ईश्वरी ज्ञानाची महिलांना जास्त आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील महिला खूप दुखी आहेत आपण त्यांच्यासाठी हे कार्यक्रम आयोजन करू आम्हीही सर्व महिला सेवा केंद्रावर येऊन सात दिवसाचा राजयोग कोर्स करू व जास्तीत जास्त लोकांनाही याचा लाभ करून देऊ. आम्ही आपल्या कार्याला संपूर्ण सहभागी होऊन या सर्व गोष्टीची आता आवश्यकता आहे. रत्नप्रभा पाटील यांनी महिलांवर कविता म्हणून दाखवली कार्यक्रमाच्या शेवटी 75 दीपप्रज्वलन केले व सर्वांना प्रसाद वाटप केला. या कार्यक्रमाला 200 महिला उपस्थित होत्या कार्यक्रम सफल होण्यासाठी टाकळी उपशाखेतील यादव माता, सुजाता माता, वनिता माता, अश्विनी माता, खुळपे माता व खुळपे भाई तसेच अनेक साधक यांचा सहयोग लाभला.