*कासाळगंगा ओढ्याच्या पुलावरील वाहतुकीची ग्रामीण पोलीस स्टेशन कडून    पाहणी* *पोलिस निरीक्षक रेखा घनवट  यांच्या सावधानतेचा इशारा* 

*कासाळगंगा ओढ्याच्या पुलावरील वाहतुकीची ग्रामीण पोलीस स्टेशन कडून    पाहणी*  *पोलिस निरीक्षक रेखा घनवट  यांच्या सावधानतेचा इशारा* 

पंढरपूर /प्रतिनिधी

कासाळगंगा ओढ्यावरील पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने , पाण्याची मोठी आवक वाढली आहे यामुळे ओढ्यावरील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आहे याबाबत वाहतुकीच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक रेखा घनवट यांनी भेट देऊन, या भागातील लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

  कटफळ ,महूद ,भाळवणी, महिम ,धोंडेवाडी ,जैनवाडी, गार्डी, उपरी, भडीशेगाव, शेळवे या गावांमध्ये जोरदार पाऊस झालेला होता. त्यामुळे कासाळगंगा ओढ्याला तीन-चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत आहे .कासाळगंगा ओढ्याला पूर आलेला होता कासाळगंगा ओढ्यावरील अनेक पूल पाण्याखाली गेलेले होते त्यामुळे अनेक पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आलेली होती. पंढरपूर पुणे जुना पालखी मार्ग शेळवे येथील कासाळगंगा ओढ्यावरील पुलावरून चार दिवसापासून पंधरा ते वीस फूट पाण्याचा प्रवाह वाहत होता .तो  सध्या दिनांक 24 सप्टेंबर रोजी तीन ते चार फूट अद्यापही या पुलावरून पाण्याचा प्रवाह वाहत आहे .तो पूल वाहतुकीसाठी सध्याही बंद ठेवण्यात आलेला आहे. या पुलाची पाहणी आज पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक रेखा घनवट यांनी केली. त्यांनी सतर्क व सावधान राहण्याच्या सूचना केल्या. तसेच जोपर्यंत या पुलावरून पाण्याचा प्रवाह आहे. तोपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्या समवेत पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अजित मिसाळ, अमर सुरवसे, सुनील लोंढे तसेच शेळवे गावचे पोलीस पाटील  ऍडहोकेट नवनाथ पाटील ,तसेच शेळवे परिसरातील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.