*बालकांचे हित जपण्याकरता बालविवाह रोखणे हीच काळाची गरज -पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे* *सांगवी येथे महिला बचत गट, आशा वर्कर, ग्रामस्थ यांना बालविवाह रोखण्यासाठी संदर्भात केले आवाहन

करकंब/ प्रतिनिधी
:-सध्या समाजामध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणात बालविवाहाचे प्रमाण वाढत असल्या कारणाने हे बाल विवाह रोखण्यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेने प्रयत्न करण्याची गरज असून हे बालविवाह ज्यांच्यावर रोखण्याची जबाबदारी आहे त्यांनीही या बालविवाह संदर्भात काळजीपूर्वक हे बालविवाह रोखले पाहिजेत असे मत करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे यांनी व्यक्त केले.
सांगवी तालुका पंढरपूर येथील गगनगिरी महाविद्यालयात बालविवाह व विविध कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या तसेच महिला बचत गट आणि आशा वर्कर पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुंडे यांनी सांगितले की, या बालविवाहातून अनेक प्रश्न समाजासमोर निर्माण होतात, तसेच कुटुंबातील ही निर्माण होतात. या बालविवाह कायद्यांतर्गत या कायद्याप्रमाणे 18 वर्षांहून लहान मुलगी व 21 वर्षाहून कमी वयाचा मुलगा कायदेशीर विवाहासाठी योग्य नसतात. त्यामुळे वर किंवा वधू यांच्यातील एक जरी अल्पवयीन असले तरी बालविवाह ठरतो. असा विवाह करणारी सज्ञान व्यक्ती, लग्न ठरवणारे, हजर असलेले सर्व या कायद्यानुसार गुन्हेगार ठरू शकतात. याबाबत माहिती देऊन त्यामुळे या बालविवाहाच्या अनुषंगाने शाळा महाविद्यालय आपल्या बचत गटाच्या आशा वर्कर व ग्रामस्थांच्या माध्यमातून असे बालविवाहाची माहिती देऊन हे बालविवाह रोखुन संबंधित पोलीस पाटील अथवा करकंबपोलीस ठाणे यांना कळवणे आवश्यक असल्याचे सांगून शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी रोडरोमियो च्या त्रासाबद्दल कोणी त्रास देत असेल तर याबाबत ही पोलीस ठाण्यास जरूर माहिती द्यावी, तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध उद्योगातून आपल्या कुटुंबाची प्रगती करण्याची त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी घोळवे, पोलीस पाटील नारायण जाधव, मुख्याध्यापक पोपट भोसले, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ भोसले, बंडू कदम, वसंत शिंदे आदीसह बहुसंख्य माध्यमिक शिक्षक, जिल्हा परिषद शिक्षक, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.