*शेवते येथे शेतात गांजाची लागवड ..!* *करकंब पोलिसांनी ठोकल्या बेड्या*.

*शेवते येथे शेतात गांजाची लागवड ..!*  *करकंब पोलिसांनी ठोकल्या बेड्या*.

करकंब/प्रतिनिधी
शेवते ता पंढरपूर येथे संतोष पुरी यांच्या शेतात गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती करकंब पोलिसांच्या पथकाला मिळताच सपोनि- निलेश तारू यांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी सापळा लावून एकूण 16 लाख 22 हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

   याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि 7 एप्रिल रोजी पोसई संजय फुगारे,पोहेका दादा सुळ यांना गोपनीय बातमीदाराकडील माहितीनुसार मौजे शेवते ता. पंढरपुर या गावचे शिवारात संतोष चंद्रशेखर पुरी रा शेवते ता. पंढरपुर याने त्याची शेती गट नं २५०/१/अ मध्ये गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याचे समजले असता यानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापुर, सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे,अपर पोलीस अधिक्षक हिमंत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे करकंब पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक- निलेश  तारू, पोलीस उपनिरीक्षक महेश मुंढे, पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे, पोसई संजय फुगारे, सहा. पोलीस उपनिरीक्षक कैलास हरिहर,पोहेकॉ दादा सुळ, बालाजी घोळवे, अरूण राजकर, पोना संतोष पाटेकर, अभिजीत कांबळे, दिपक लेंगरे, दया हजारे, पोकॉ अमोल घुगे, शाम गायकवाड, पो का स्वप्निल बागल असे पोलीस पथक तयार करून सापळा रचुन सदर  ठिकाणी छापा टाकुन लहान मोठी २१० गांजाची झाडे, नविन लागवडी करीता तयार केलेली २६३ रोपे व लागवड केलेली ८० रोपे लावलेल्या स्थीतीमध्ये ठिबक पाईपासह दि 7 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजनेच्या सुमारास संतोष चंद्रशेखर पुरी वय ३५ वर्षे, रा शेवते ता. पंढरपुर जि.सोलापुर याचे ताब्यातुन एकुन १६,२२,४००/- रूपये किंमतीचा ११७ किलो ५१ ग्रॅम वजनाचे गांजाचे हिरव्या झाडाची पाने, मुळ, फांदी, फुलणारा शेंडा व लहान रोपे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
     याबाबत बाबत पोहेकॉ  दादा सुळ यांनी पोलिसात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी संतोष चंद्रशेखर पुरी वय ३५ वर्षे रा शेवते ता. पंढरपुर यास अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक निलेश शिवाजी तारु हे करीत आहेत.