*करकंब येथील सोमवार पेठ येथे कै.सौ. कांचन विठ्ठल शिंगटे यांच्या स्मरणार्थ C C T V लोकार्पण सोहळा संपन्न....!* *शिंगटे परिवाराने जोपासली सामाजिक बांधिलकी..

*करकंब येथील सोमवार पेठ येथे कै.सौ. कांचन विठ्ठल शिंगटे यांच्या स्मरणार्थ C C T V लोकार्पण सोहळा संपन्न....!*  *शिंगटे परिवाराने जोपासली सामाजिक बांधिलकी..

 करकंब/ प्रतिनिधी:

-करकंब येथील विवेक शिंगटे व शिंगटे  परिवार यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ प्रभाग 6 मध्ये स्मार्ट सोमवार पेठ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनCCTV कॅमेरे बसवून एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले असल्याची भावना या प्रभागातील नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. यापूर्वी कॉंक्रीट रस्ते वृक्षारोपणाची कामे झाली असून आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पाच चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून या प्रभागातील लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा उपक्रम स्वखर्चाने हाती घेतला आहे. या माध्यमातून चोरी अस्वच्छता व इतर बाबींवर आळा बसणार आहे. या भागातील सोमवार पेठ काळा मारुती श्रीराम नगर या भागात सीसी टी व्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. उपक्रमांमध्ये शिंगटे परिवाराचा सिंहाचा वाटा असून एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी या उपक्रमातून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
या सीसीटीव्ही कॅमेरा लोकार्पण सोहळ्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुंडे, माजी उपसरपंच बाळासाहेब शिंगटे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख,विवेक शिंगटे, राहुल शिंगटे, ज्ञानेश्वर दुधाने प्राध्यापक सतीश देशमुख, युवा नेते अभिषेक पुरवत, नात्याबा मोहिते , शिवसेना उपतालुका प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य संतोष धोत्रे,माजी ग्रामपंचायत सुनील मोहिते, रघुनाथ जाधव, माझी पंचायत समिती सदस्य प्रभाकर वास्ते, व शिंगटे परीवार तसेच या भागातील प्रतिष्ठित व्यापारी नागरिक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना विवेक शिंगटे यांनी सांगितले आईची आठवण राहावी. या प्रामाणिक हेतूने यापुढे अशा पद्धतीचे असंख्य सामाजिक उपक्रम घेऊन सामाजिक जाम बांधिलकी जोपासण्याचे काम करणार आहे.