*पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नवरात्र उत्सव पार्श्वभूमीवर पार पडली बैठक* *पो.नि. रेखा घनवट यांनी पोलिस पाटील यांच्यासह मंडळ पदाधिकाऱ्यांना दिल्या योग्य सूचना*

पंढरपूर/प्रतिनिधी
आगामी नवरात्र उत्सव हा योग्य पद्धतीने अर्थात गणेशोत्सव प्रमाणे शांततेत साजरा करण्याच्या दृष्टीने, पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने योग्य मार्गदर्शन करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये पोलीस पाटलांसह ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विविध गावातील विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक रेखा घनवट यांनी योग्य मार्गदर्शन आणि सूचना दिल्या आहेत.
यावेळी आगामी नवरात्री उत्सव साजरा करताना, शांततेचा भंग न करता साजरा करण्याचे आव्हान केले. गावातील कायदा सुव्यवस्था व शांतता राहण्यासाठी गावातील पोलीस पाटलांनी व नवरात्र उत्सव मंडळांनी प्रयत्न करावेत . अशी सूचना केली नवरात्री उत्सव साजरी करताना, विविध सामाजिक उपक्रम राबवावीत यामध्ये लहान मुला मुलींसाठी स्पर्धा आयोजित कराव्यात. तसेच वृक्षारोपण करावे .अशी सूचना केली नवरात्री उत्सव साजरी करताना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची नो डीजे नो डॉल्बी नो लाइट्स नो लेजर्स याची पोलीस पाटलांनी व नवरात्र उत्सव मंडळांनी अंमलबजावणी करावी अशी सूचना केली. नवरात्री उत्सव साजरा करताना त्या ठिकाणी शक्य असेल तर कॅमेरा व सीसीटीव्ही ची व्यवस्था करावी. असे आव्हान केले आहे.शेवटी समारोप करताना दिलेल्या सूचनांचे नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी पालन करावे असे सांगितले.
या बैठकीसाठी पी.एस.आय वीरसेन पाटील, शेळवे गावचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील एडवोकेट नवनाथ पाटील, जैनवाडी पोलीस पाटील स्मिता दानोले ,वाखरी बाळू शेंडे, वाडीकुरोलीचे अमर काळे, पाटील पिराची कुरोली शरद कौलगे पाटील, सुपली पोलीस पाटील पवार, कौठळी पोलीस पाटील माधुरी नागटिळक, कोर्टी चे अनिल दगडे, लोणारवाडीचे हरीश गंगनमले पाटील, भंडीशेगावचे गावचे कस्तुरे पाटील, व इतर ग्रामीण भागातील पोलीस पाटील व नवरात्र उत्सवाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.