*करकंब मध्ये लोकवर्गणीतून बांधलेल्या मंडळ अधिकारी कार्यालयाचा उद्या दि 19 फेब्रुवारी रोजी लोकार्पण सोहळा

करकंब(प्रतिनिधी) :-
करकंब ग्रामस्थ,शेतकरी वर्ग यांच्या सहकार्याने लोकवर्गणीतून पूर्ण झालेल्या सुसज्ज अशा मंडळ अधिकारी कार्यालय इमारतीचा लोकार्पण सोहळा व तलाठी कार्यालय नूतनीकरण उद्या दि 19 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रांताधिकारी श्री गजानन गुरव, तहसीलदार श्री सुशील बेल्हेकर,मंडलाधिकारी श्री चंद्रकांत ढवळे,तसेच तलाठी श्री दादासाहेब पाटोळे हे उपस्थित राहणार आहेत.
तसेच कार्यालयीन कर्मचारी कोतवाल श्री गुलाब कोरबू, लिपिक श्री चंद्रकांत उंबरदंड तसेच करकंब येथील सर्व अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी वर्ग ,ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उद्या दि 19 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 11 वाजता येथील कार्यालयाचे प्रांगणात संपन्न होणार आहे.तरी सर्वानी उपस्थिती राहून कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे आव्हान करण्यात आले आहे.