पंढरीतून शिवमल्हार न्युजची सेवा सुरू

पंढरीतून शिवमल्हार न्युजची सेवा सुर
पंढरपुर :प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील गेली अनेक वर्ष पत्रकारिता केलेले महालिंग उर्फ आबासाहेब दुधाळे यांनी आज बुधवार दि 12 मे पासून शिव मल्हार न्यूज च्या माध्यमातून सेवा सुरू केली आहे.
महालिंग दुधाळे यांनी 1995 पासून ग्रामीण भागातून पत्रकारिता सुरू केली होती. त्यांनी पंढरपुर शहरातील विविध भागात जाऊन वृत्तपत्र विक्री करीत पंढरपूर शहर आणि तालुक्यातील सर्व भागातून पत्रकारिता केली आहे. विविध दैनिकात त्यांनी तालुका प्रतिनिधी आणि पंढरपुर विभागाचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. त्यांनी आता स्वतःच्या नावावर एक शिवमल्हार नावाने सेवा सेवा सुरू केली आहे. या शुभारंभ नंतर उद्यापासून दररोज ही सेवा सुरू राहणार आहे,
महालिंग दुधाळे यांनी आजवर पत्रकारिता करीत असताना सर्वच समाजसेवा, राजकीय नेते, विविध सामाजिक चळवळ करणाऱ्या अनेकांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली आहे, त्यामधील अनेक राजकीय नेते आजही दुधाळे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल जाणीव मनात ठेवून आहेत, त्यामुळे या शिवमल्हार न्युज ची सेवाही यापुढील काळात नक्की मिळणार आहे,