*खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मागणीनुसार १०कोटीचा निधी मंजूर* *माढा लोकसभा मतदार संघासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून कामे मंजूर* *२५१५आणि १२३८ या लेखा शीर्षकाअंतर्गत विविध विकास कामांना होणार लवकरच सुरुवात*

*खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मागणीनुसार १०कोटीचा निधी मंजूर*  *माढा लोकसभा मतदार संघासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून कामे मंजूर*  *२५१५आणि १२३८ या लेखा शीर्षकाअंतर्गत विविध विकास कामांना होणार लवकरच सुरुवात*

पंढरपूर/प्रतिनीधी

माढा लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आजवर केंद्रातून हजारो कोटी रुपयाचा विकास कामासाठी निधी मंजूर करीत विकास कसा करायचा असतो, हे दाखवून दिले आहे. अशातच त्यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. गिरीष महाजन यांचेकडून विविध विकास कामासाठी तब्बल १०कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला असून ही कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती खा. निंबाळकर यांनी दिली आहे.
  हा मंजूर करण्यात आलेला १०कोटी रुपयाचा निधी २५१५आणि १२३८या लेखा शीर्षका अंतर्गत सन २०२३-२४ साठी मंजूर करण्यात आला आहे.
    या मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांमध्ये सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदार संघातील माण , खटाव,करमाळा, माढा,सांगोला, पंढरपूर,माळशिरस या तालुक्यातील विविध गावातील एकूण १११ विकास कामांचा समावेश आहे.
 खा. निंबाळकर यांनी केलेल्या मागणीनुसार ग्रामविकास विभागातून ही कामे मंजूर करण्यात आली आहेत. यामधे राज्यपालांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाचे कर्यासन अधिकारी अभिजित तेलवेकर यांनी १४डिसेंबर चे पत्रानुसार लेखी कळविलेआहे.


      खा. निंबाळकर यांनी आपल्या या खासदारकीचे कार्यकाळात जास्तीत जास्त निधी खेचून माढा लोकसभा मतदार संघातील मोठा विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे त्यांची ओळख कामाचा लोकप्रिय खासदार अशी मतदार संघात झाली आहे . याच विकासाचे जोरावर त्यांना भाजपची उमेदवारी निश्चित मानली जात असून, भाजप आणि महायुतीतील नेत्यांकडून त्यांच्या प्रचाराची मागील अनेक दिवसापासून तयारी सुरू ठेवली आहे .