स्व भारतनाना *भालके यांच्या पुण्यतिथीनिमित्त तारापूर येथे रक्तदान शिबिर संपन्न*

स्व भारतनाना *भालके यांच्या पुण्यतिथीनिमित्त तारापूर येथे रक्तदान शिबिर संपन्न*

 पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर मंगळवेढा चे  लोकप्रिय आ.स्व. भारत (नाना) भालके यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त तारापूर येथे डॉ प्रनिता ताई भालके यांच्या हस्ते नाना यांच्या प्रतिमेचे पूजन करून फुले वाहण्याचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमा प्रसंगी भजन किर्तनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.
                         याप्रसंगी तारापूर ग्रामस्थ व भारत नाना भालके प्रेमी यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते 51 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले.
                         या कार्यक्रमास अँड रामलिंग कोष्टी, युवा नेते समाधान जगताप, सरपंच पोपट, कोळी  मच्छिंद्र नायगुडे, अँड लक्ष्मण दाडगे, अँड शक्ति माने, अँड समाधान गाडे, अँड नायगुडे, अतिश गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य लाकत मुलानी, बसलिंग कोष्टी, आदि मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी युवा नेते समाधान जगताप यांनी परिश्रम घेतले.