*तरुणांना उद्योगशील बनविण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील - नागेश फाटे* *परभणी येथील बैठकीत, माजी मंत्री फैजिया खान यांच्याशी चर्चा*
पंढरपूर (प्रतिनिधी)
तरुणांमध्ये व्यापार आणि उद्योगाबद्दलचे आकर्षण वाढण्याकामी, त्यांना योग्य ते मारदर्शन करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत आहे. याचा जास्तीत जास्त तरुणांना कसा फायदा होईल ,यादृष्टीने प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक नेतेमंडळींनी प्रयत्न करावा ,असे आवाहन राष्ट्रवादीच्या व्यापारी सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी केले .परभणी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा माजी शिक्षणमंत्री फैजिया खान यांच्याशी चर्चा केली आणि मार्गदर्शन घेतले. याप्रसंगी येथील राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष किरण सोनटक्के, तालुकाध्यक्ष संतोष देशमुख आदी प्रमुख उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या व्यापारी सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांचा राज्यभर झंझावाती दौरा सुरू आहे. यानिमित्ताने गुरुवारी त्यांनी आपला परभणी दौरा पार पडला. परभणी येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस मार्गदर्शन केले .या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री खा. फैजिया खान आवर्जून उपस्थित होत्या. या बैठकीनंतर खासदार फैजिया खान यांच्याशी झालेल्या चर्चेत पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली.

तरुणांना पक्षात सामावून घेणे, उद्योग आणि व्यवसायाबाबत मार्गदर्शन करणे , त्यांना नवीन उद्योगासंदर्भातील माहिती देणे, आर्थिक अडचणी संदर्भात मार्गदर्शन करून त्या सोडवणे यासंदर्भातील काम राष्ट्रवादी काँग्रेसने हाती घेतले आहे. हे काम करताना, तळागाळातील कार्यकर्त्यांना सामावून घेण्यात येत आहे. राष्ट्रवादीत तरुणांचा सहभाग वाढवणे हा उद्देश ठेवूनच, राष्ट्रवादी व्यापारी सेलचा प्रवास सुरू आहे , भविष्यात उद्योगा संदर्भातील नवनवीन संकल्पना समोर ठेवून कार्य करण्यात येणार असल्याची माहिती , नागेश फाटे यांनी यावेळी दिली .खा.फैजिया खान यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे परभणी तालुका उपाध्यक्ष संजय अदोडे, जिल्हा युवक अध्यक्ष रितेश काळे,पंढरपूर ता उपाध्यक्ष कल्याण कुसुमडे आदी उपस्थित होते.