*कृषी विषयी ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांना मिळणार सर्व महत्त्वाची माहिती -कृषी मित्र रोहित कदम*

*कृषी विषयी ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांना मिळणार सर्व महत्त्वाची माहिती -कृषी मित्र रोहित कदम*

पंढरपूर:-प्रतिनिधी
अॅग्रीअॅप,क्रॉप  इन्शॉरन्स,इफको ,किसानपुसा किसान सुविधा  अशा प्रकारच्या अनेक एप्लीकेशन बद्दल कृषी मित्र रोहित कदम यांनी नांदुरे येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सुविधा ॲप २०१६ मध्ये लाँच केले होते. हे अॅप वापरण्यासाठी खूपच सोपं आहे. आजच्या हवामानाबरोबर येणाऱ्या ५ दिवसांच्या हवामानाची माहिती या अॅपद्वारे दिली जाते. तसेच आजूबाजूच्या बाजारातील पिकांच्या किंमतीबद्दलही सूचना मिळते. हे अॅप अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे     
      भारतात कोणकोणती पिकं घेतली जातात? आपल्या शेतात कोणतं पीक घेता येईल? त्यासाठी आवश्यक ती माहिती हे सर्व काही शेतकऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकणार आहे.पिकाच्या काढलेल्या एका फोटोवरून किंवा एखाद्या छोट्याशा व्हिडीओवरून, त्या पिकाकरीता लागणारं हवामान, आर्द्रता, माती, पाणी यासारखी माहिती ॲपमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर फक्त फोटोवरून ते पीक कोणतं आहे हेसुद्धा ओळखण्याची क्षमता ॲपमध्ये आहे. संपूर्ण भारतात कोणकोणती पिकं घेतली जातात त्यांची माहिती विविध नकाशांच्या आधारे या ॲपमध्ये उपलब्ध आहे. आपल्या शेतात कोणतं पीक घ्यायचं आहे, याची माहिती शेतकऱ्यांना हवी असेल, तर शेतात जाऊन शेताचं लोकेशन ॲपमध्ये नोंदवून वातावरणाची माहिती टाकली असता, त्या शेतात कोणती पिकं घेता येतील आणि त्या पिकांना आवश्यक वातावरणाची माहिती लगेचच शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर हवामानविषयक माहितीसुद्धा यामध्ये उपलब्ध आहे असे रोहित कदम यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित,रत्नाई कृषी महाविद्यालय,अकलूज आयोजित ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत व्यक्त केले. त्याकरिता अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील,रत्नाई कृषी महावद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी.कोरटकर, प्राचार्य आर.जी. नलवडे, प्रा.एस. एम. एकतपुरे, प्रा. एस. आर. आडत,प्रा. डी. एस. मेटकरी प्रा एम एम चंदनकर यांचे मार्गदर्शन लाभले