*पंढरपूरमधील दारूबंदी कार्यालयाचे पांग फिटले* *बांधकामास राज्य शासनाची मंजुरी* *आ. समाधान आवताडे यांनी केला होता पाठपुरावा*

*पंढरपूरमधील दारूबंदी कार्यालयाचे पांग फिटले*  *बांधकामास राज्य शासनाची मंजुरी*  *आ. समाधान आवताडे यांनी केला होता पाठपुरावा*

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आ. समाधान आवताडे यांनी येथील दारूबंदी विभागाच्या कार्यालयासाठी मोठा पाठपुरावा केला असून, या कार्यालयाच्या बांधकामासाठी तब्बल 4 कोटी 60 लाख 86 हजार रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. राज्यपालांची स्वाक्षरी असलेला अध्यादेश नुकताच निघाला असून, दारूबंदी विभागाच्या कार्यालयाचे रूपडेच पालटून जाणार आहे.

पंढरपूरमध्ये नवीन कराड नाक्यासमोर दारूबंदी विभागाच्या निरीक्षकांचे कार्यालय आहे. या कार्यालयातूनच माढा, माळशिरस ,करमाळा, मंगळवेढा आदी तालुक्यातील दारूबंदीचे कामकाज चालते. दारूबंदी विभागाच्या मालकीच्या या जागेत ब्रिटिशकालीन कौलारू जुने बांधकाम आहे.
या दोन खोल्यातूनच चार तालुक्यांचा कारभार चालतो. निरीक्षक, उपनिरीक्षक यांना स्वतंत्र केबिनचा पत्ता नव्हता. यामुळे या ठिकाणी आलेल्या नागरिकांना कोण साहेब ? आणि कोण शिपाई, याचा पत्ताही लागत नव्हता. सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हे महत्त्वाचे दुसरे कार्यालय आहे. असे असतानाही या कार्यालयाची ही दुरवस्था आहे. 


या कार्यालयाच्या बांधकामासाठी आ. समाधान आवताडे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. अखेर या पाठपुराव्यास यश आले. 23 फेब्रुवारी रोजी या बांधकामास निधी मंजूर करण्यात आला, आणि याबाबतच्या शासन निर्णयाचे परिपत्रकही प्रसिद्ध झाले आहे.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक प्रसिद्ध झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभागास 4 कोटी 60 लाख 86 हजार रुपये खर्चून, हे बांधकाम बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. वित्तीय अधिकार नियम पत्रिकेतील काही अधिकारांचा वापर करून, सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम पुरे करून घ्यावे , असा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आला आहे. हे बांधकाम पूर्णत्वास गेल्यास पंढरपूर शहरात दारूबंदी विभागाचे कार्यालय आहे, हे नागरिकांना माहीत होणार आहे. या कार्यालयास निश्चितच उर्जितवस्था अवस्था येणार आहे.

चौकट

पंढरपूर शहरात कार्यरत असणारे दारूबंदी विभागाचे कार्यालय येथील कराड नाक्यावर आहे. अत्यंत जुन्या बांधकामात असणाऱ्या या कार्यालयाच्या बांधकामास नुकतीच राज्य शासनाने परवानगी दिली असून, या कामी 4 कोटी 60 लाख 86 हजार इतकी रक्कम खर्च करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास मान्यता दिली आहे. या बांधकामाच्या मंजुरीसाठी आ समाधान आवताडे यांनी मोठे परिश्रम घेतले आहे.