*सावंत बंधूची एक लाखाची मदत* *नंदेश्वर येथील घटनेतील कुटुंबियांच्या संत्वनपर भेटीतच भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी केली आर्थिक मदत *

पंढरपूर/प्रतिनीधी
नंदेश्वर (ता.मंगळवेढा) येथे मागील काही दिवसापूर्वी घडलेल्या तिहेरी हत्याकांडातील बाळू महादेव माळी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना एक लाख रुपयाची आर्थिक मदत भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल(दादा) सावंत यांनी केली.
यावेळी या दू:खद प्रसंगी सहवेदना व्यक्त करून माळी कुटुंबास या दू:खातून सावरण्याचे बळ मिळो अशी त्यांनी प्रार्थना केली
.बाळू महादेव माळी कुटुंबाचे जे नुकसान झाले आहे ते कधीच न भरून निघणारे आहे, ही घटना खरोखरच मानवतेच्या धर्माला आणि सामाजिक एकरूपतेला काळिमा फासणारी आहे असे यावेळी भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत म्हणाले.
भैरवनाथ शुगर चे संस्थापक ना.डॉ.तानाजीराव सावंत (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य) व भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शुगर हा नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत आला आहे. त्याच बांधीलकीतून आजही फूल ना फुलाची पाकळी या भावनेतून भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी यावेळी बाळू महादेव माळी कुटुंबाला रु.एक लाखाची आर्थिक मदत जागेवरच देवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
यावेळेस शिवसेन तालुका अध्यक्ष अशोक चौंडे, बंडू जाधव,लवटे अण्णा व परिसरातील नागरिक उपस्थित होते.