*करकंब येथे दिनांक 30 रोजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पूर्व भागातील पाण्याच्या प्रश्नासंदर्भात दौरा*.  *भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब अंबुरे यांनी दिली माहिती*.

*करकंब येथे दिनांक 30 रोजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पूर्व भागातील पाण्याच्या प्रश्नासंदर्भात दौरा*.  *भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब अंबुरे यांनी दिली माहिती*.


 करकंब/ प्रतिनिधी:

करकंब येथील ब्रिटिश कालीन असलेला सुमारे 45 एकर मध्ये असलेला गाव पाझर तलावामध्ये पाण्याचा फाटा सोडून करकंब च्या पूर्व भागातील असंख्य शेतकऱ्यांच्या पूर्वीपासून असलेला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब अंबुरे यांनी माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्यामुळे या बाबीची दखल खुद्द खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतल्याने स्वतः खासदार नाईक निंबाळकर हे दिनांक 30 रोजी करकंब येथील गाव पाझर तलाव व पूर्व भागातील असलेल्या शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासंदर्भात भेट देणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब अंबुरे यांनी सांगितले.
   करकंब येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे येणार असल्याने भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी पक्षाचे कार्यकर्ते शेतकरी बांधव व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब अंबुरे यांनी केले आहे.