*पोलीस चालक पदावर निवड झाल्याबद्दल प्रेमराज बागल या युवकाचा सत्कार*

*पोलीस चालक पदावर निवड झाल्याबद्दल प्रेमराज बागल या युवकाचा सत्कार*

पंढरपूर /प्रतिनिधी
 
पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील प्रेमराज दिलीप बागल यांची नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलात "पोलीस चालक" पदावर यशस्वी निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्रेमराज बागल यांचे वडील दिलीप बागल यांचाही सन्मान करण्यात आला.
  
याप्रसंगी प्रेमराज बागल यांनी यशस्वी निवडीसाठी घेतलेल्या परिश्रमांची माहिती उपस्थितांसमोर मांडली. त्यांचे हे यश इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे, असे मत नागेश फाटे यांनी व्यक्त करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उद्योगपती हरिभाऊ काळे,   डॉ रमेश फाटे ,सौरभ काळे, संग्राम कापसे, ज्ञानेश्वर पवार उपस्थित होते.