*मालकाच्या.. बदललेल्या रणनीतीमुळे ....  आबांचं  चाललय तरी काय....!* *करकंब सह ग्रामीण भागाची मार्केट कमिटीत निर्णायक भूमिका ठरणार...!* *पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक.*

*मालकाच्या.. बदललेल्या रणनीतीमुळे ....  आबांचं  चाललय तरी काय....!*  *करकंब सह ग्रामीण भागाची मार्केट कमिटीत निर्णायक भूमिका ठरणार...!*  *पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक.*


करकंब /प्रतिनिधी

 :- सध्या पंढरपूर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर निवडणुकीचा "पांडुरंग" परिवाराचा प्रचाराचा धुमधडाका जोरात सुरू आहे. मात्र "विठ्ठल" परिवारात अजुनही "शांतता" दिसून येत आहे.यापूर्वी अनेक निवडणुका लागल्या... पार पाडल्या.. पूर्वीच्या निवडणुकांमध्ये पांडुरंग परिवाराची करकंब सह अगदी गुरसाळ्यापर्यंत ग्रामीण भागाची पांडुरंग परिवार महत्त्वाचा "बालेकिल्ला" म्हणून ओळखला जायचा. मात्र पंढरपूरच्या नेतृत्वाने या भागाकडे "अक्षम्य दुर्लक्ष" केल्याने अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून ते करकंबसह ग्रामीण भागातील सरपंच , आजी-माजी -ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते ,सामान्य वर्ग, व्यापारी यांना विश्वासात न घेता वाऱ्यावर सोडल्याने पांडुरंग परिवाराची अवस्था "शोले "चित्रपटातील "असरानी" सारखी झाली होती. तुम इधर जाओ...तुम उधर जाओ...बाकी सब मेरे पीछे आजाओ....! अशा परिस्थितीमुळे "पांडुरंग" चा या करकंबसह ग्रामीण भागातील बालेकिल्ला फक्त नावालाच ऊरला होता. त्यातच गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा "स्वाभिमानी सभासदांनी मात्र आज पर्यंत"निकराने "झुंज"देत राहिल्याने पांडुरंगाच्या बालेकिल्लाला तडे जात गेले. त्यामुळे मालकांनी या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने पूर्णता रणनीतीच बदलून टाकली.  आगामी काळात याच रणनीतीने काम केल्यास निश्चितच   पांडुरंग परिवाराचा बालेकिल्ला अधिकच भक्कम होईल. याचीही चर्चा होताना दिसून येत आहे.  यंदाची ही कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मात्र वेगळ्याच वळणावर आली असल्याने पंढरपूर तालुक्यातील सामान्यतील -सामान्य कार्यकर्ता असो की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील (मतदार) शेतकरी, व्यापारीअसो याचे महत्त्व  या निमित्ताने दिसून येत आहे. अनेक वर्षापासून तालुक्याच्या हिताचे... विकासाचे ..आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे अभ्यासू व असलेले नेतृत्व कधी नव्हे ते रणनीतीमुळे अनेक जण अचंबित झाले. तर अनेक जणांना आश्चर्याचा धक्काही बसला. असून यापूर्वी ज्या घडामोडी घडल्या. त्या सगळ्या विसरून यापुढे नव्या जोमाने.. नव्या उमेदीने पांडुरंग परिवारात" श्रीमंतांनी" घालून  दिलेला आदर्श यापुढील काळात झाला .तरच आत्ता बांधलेली ही मोट भविष्यात निश्चितच या "नेतृत्वाने" बदललेल्या रणनीती मुळे निश्चितच लाभ होणार असल्याचे राजकीय तज्ञातून बोलले जात आहे. असे असले तरी करकंब सह ग्रामीण भागातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य ,पदाधिकारी, शेतकरी ,व्यापारी, अथवा सामान्यातला -सामान्य कार्यकर्ता असो अशांना विश्वासात घेऊन किमान निवडणुकीपुरते जवळ न करता इतर वेळी "काळजीपूर्वक"आणि विचारात घेऊन यापुढील काळात काम न करावे लागेल .असे जाणकारातून बोलले जात आहे. तालुक्याचे नेतृत्व करताना या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने मालकाचे बदलेल्या रणनीतीमुळे...  या मार्केट कमिटीच्या निवडणुकीत आबांचं चाललंय तरी काय....! ही चर्चा मात्र जोरात मतदारातून  ऐकावयास मिळत आहे. अनेक सरपंच , ग्रामपंचायतसदस्य, सोसायटी सभासद, व इतर मतदार यांच्या या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात वेगवेगळ्या भूमिका असल्या तरी आजच्या "घडी "ला मात्र यांना महत्त्व प्राप्त झाले असून यापूर्वी कधीच विचारले जात नव्हते .आज मात्र घरोघरी.. समक्ष... प्रत्यक्ष भेटून आपापली भूमिका स्पष्ट करीत असल्याने ही  मालकांची रणनीती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी "महत्वपूर्ण" असल्याची चर्चाही  व्यक्त केली जात आहे. या मालकाच्या रणनीतीमुळे  "आबा" मात्र महाभारत मधील अभिमन्यू  प्रमाणे चक्रव्यूहात सापडले की काय ...?अशी चर्चा पंढरपूर तालुक्यात होतआहे.