*नरसप्पा देशमुख यांच्या भूमिकेकडे संपूर्ण पंढरपूर तालुक्याचे लक्ष.....!* *श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या..  लढतीत आप्पांची ...भूमिका महत्त्वाची राहणार.

*नरसप्पा देशमुख यांच्या भूमिकेकडे संपूर्ण पंढरपूर तालुक्याचे लक्ष.....!*   *श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या..  लढतीत आप्पांची ...भूमिका महत्त्वाची राहणार.

करकंब/ प्रतिनिधी:

-सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा संघटक, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन, आणि पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठी.... ग्रामपंचायत ताब्यात असलेले ज्येष्ठ नेते नरसाआप्पा देशमुख  यांची ...भूमिका सध्या गुलदस्त्यात ....असल्याने नरस आप्पा देशमुख यांच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष... लागून राहिले असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात राजकीय दबदबा निर्माण करणारे ज्येष्ठ नेते नरस आप्पा देशमुख यांनी आपल्या संघटन कौशल्यातून सामान्यातून अगदी तळागाळातील लोकांशी जनसंपर्क निर्माण करीत प्रत्येक वेळी पंढरपूर तालुक्यातील सर्वात..... मोठी ग्रामपंचायत मध्ये... सत्ता निर्माण केली. त्याच बरोबर करकंब आणि करकंब सह 30 ते 40 गावाशी संलग्न असणाऱ्या पदाधिकारी ..असो अथवा सामान्य तळागळातील कार्यकर्ता ...असो की...... सर्वसामान्यांसी दांडगा जनसंपर्क ......ठेवून करकंब या भागात आपले एक वेगळे वर्चस्व निर्माण केल्याची चर्चा या ग्रामीण भागातून ही केली जात आहे. त्यामुळे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने करकंब गट, भोसे गट व आदी भागात अनेक जण आप्पांच्या भूमिकेकडे लक्ष देऊन असून नरस आप्पा देशमुख कोणती भूमिका घेतात...? याकडे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून संपूर्ण पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागून राहिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यापूर्वी नरस आप्पा देशमुख यांनी श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून संचालक ते व्हॉइस चेअरमन पदी काम करण्याची संधी मिळाल्याने या माध्यमातून त्यांनी आणि ....अनेकांचे ....संसार उभे करण्याचे काम करून तसेच ऊस उत्पादक सभासद यांना न्यायाची भूमिका.... देण्याचे काम केले असल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी जिल्हा संघटक या माध्यमातून ग्रामपंचायत सोसायटी व विविध संस्थांच्या माध्यमातून युवक ज्येष्ठ आदी विविध क्षेत्रातील लोकांना न्याय देण्याची भूमिका आजपर्यंत केल्याने या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नरस आप्पा देशमुख हे अभिजीत उर्फ आबा पाटील, तसेच युवराज दादा पाटील गणेश दादा पाटील दीपक दादा पवार आणि कल्याणराव काळे भगीरथ भालके यांच्यापैकी कोणाच्या गटातआपल्या गटाची भूमिका पारड्यात टाकणार.....? हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे . त्यामुळे या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नरस आप्पा देशमुख यांच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.