*धावत्या-धगधगत्या जीवनात माणुसकीला नाही कदर..... सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे व मित्रपरिवार ने केला आदर.....!*  **बेवारस वृद्ध महिलेस दिला अग्नी**  **गेल्या अनेक वर्षापासून जोपासतात सामाजिक बांधिलकी**

*धावत्या-धगधगत्या जीवनात माणुसकीला नाही कदर..... सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे व मित्रपरिवार ने केला आदर.....!*  **बेवारस वृद्ध महिलेस दिला अग्नी**  **गेल्या अनेक वर्षापासून जोपासतात सामाजिक बांधिलकी**

 करकंब /प्रतिनिधी:
 आज भारताबरोबर जगामध्ये कोरोना तसेच अनेक वेगवेगळ्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत धडकत आहेत. गेल्या दोन वर्षाच्या सातत्याच्या काळामध्ये अगदी हातावरचे पोट असणाऱ्या पासून मध्यमवर्गीय असणाऱ्या लोकांचे जनजीवन पूर्ण आहे . अशा धावपळीच-व धगधगती च्या जीवनात या जगामध्ये नव्हे तर आपल्या सोन्याचा धूर निघणाऱ्या या भारत देशात आजही हातावर पोट आहे, जे मोलमजुरी करून खातात, सर्वसामान्य ,मजदूर ,मजूर कामगार ,मध्यमवर्गीय या सामान्यांना माणुसकी दाखवण्याची खरी गरज आहे. अशा माणुसकीला कदर नसल्याची खंत अनेक सुज्ञ नागरिकांमधून बोलले जाते. पण समाजामध्ये असे काही सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे अवलियाअसतात .माणुसकीची कदर जाणीवपूर्वक माणूस हाच खरा धर्म म्हणून माणूस हीच जात मानून सामाजिक बांधिलकी म्हणून काम करणारे करकंब पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे व त्यांच्या मित्र परिवाराने गेल्या अनेक वर्षा पासून हा सामाजिक बांधिलकीचा वसा कधीही प्रसिद्धीच्या झोतात न येता केला. विशेष बाब म्हणजे नुकताच करकंब येथील कोंडाबाई सावंत वय वर्ष 75 या महिलेस कोणीही वारस नसल्याने स्वतः खांदा देऊन मित्रपरिवारासह करकंब येथील स्मशानभूमीत अग्नी देऊन एक सामाजिक बांधिलकी जोपासून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे.