*पंढरपूर येथे शिवजयंतीनिमित्त ३ दिवसीय व्याख्यानमालेचे पंढरपूर येथे आयोजन* - *विठ्ठल प्रतिष्ठानच्या माध्यमातून विठ्ठलचे चेअरमन अभिजीत (आबा )पाटील यांची माहिती*

*पंढरपूर येथे शिवजयंतीनिमित्त ३ दिवसीय व्याख्यानमालेचे पंढरपूर येथे आयोजन* -  *विठ्ठल प्रतिष्ठानच्या माध्यमातून विठ्ठलचे चेअरमन अभिजीत (आबा )पाटील यांची माहिती*

प्रतिनिधी/- पंढरपूर 

पंढरपूर येथे१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमाला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या १६फेब्रुवारी रोजी व्याख्याते शिवश्री डॉ.शिवरत्न शेटे व १७फेब्रुवारी शिवश्री यशवंत गोसावी आणि १८फेब्रुवारी रोजी शिवश्री श्रीमंत कोकाटे सर यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटलाचा उलगडता इतिहास तळागाळापर्यंत पोहचावा याकरिता या तीन दिवसीय व्याख्यानाचे आयोजन विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर शिवतीर्थ येथे १६ते१८ फेब्रुवारीपासून सायंकाळी ७ ते ९या वेळेत व्याख्यानमालेस जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केले आहे.