'*तुझं वेड'या चित्रपटाच्या रिलीज संदर्भात बैठक संपन्न!*

पंढरपूर/ प्रतिनिधी
मामा भाचे फिल्म प्रोडक्शन निर्मित " तुझ वेड " या चित्रपटाच्या रिलीज संदर्भाची बैठक पंढरपूर येथे, रविवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी पार पडली. यावेळी बोलताना तुझं वेड चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक अभिनेते रघुनंदन चंदनशिवे म्हणाले की ,गेल्या येथे दीड वर्षापासून जगावर कोरोना महामारी चे संकट आल्यामुळे नाट्यगृह चित्रपट गृह बंद होती .परंतु आता शासनाने परवानगी दिल्यामुळे तुझं वेड चित्रपट आपण लवकरच सोलापूर जिल्ह्यामध्ये लवकरच रिलीज करत आहोत. सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले असल्यामुळे येथील नागरिकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली आहे. त्यामुळे पंढरपूर या ठिकाणी चित्रपटातील विविध भूमिकेत काम करणाऱ्या कलाकारांच्या सोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .कलाकारांच्या वतीने निर्माते-दिग्दर्शक अभिनेते रघुनंदन चंदनशिवे यांना कलाकारांच्या वतीने लवकरात लवकर चित्रपट रिलीज करण्यात यावा , अशी मागणीही करण्यात आली. चित्रपट रिलीज होण्या संदर्भात व प्रेक्षकांनी चित्रपट गृहात चित्रपट पाहण्यासाठी कोणत्या माध्यमांचा उपयोग करावा लागेल, या विषयी चर्चा झाली असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे
या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शन रघुनंदन चंदनशिवे यांनी सांगितले .
या चित्रपटाचे संगीत जबर धनंजय यांनी दिली आहे. या चित्रपटाची गाणी मिलिंद शिंदे सिद्धार्थ गवई आणि गौतमी जितुरी यांनी गायली असून या चित्रपटाचे गीतकार सिद्धेश्वर गायकवाड हे आहेत .या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून श्रुतिका भोसले पुणे यांनी काम केले आहे. तर अभिनेता म्हणून रघुनंदन चंदनशिवे तर सहा अभिनेत्री म्हणून आरती गायकवाड, साक्षी रणदिवे ,कांचन चंदनशिवे ,प्राजक्ता जाधव, हर्षवर्धन माने, बैठकीसाठी डॉक्टर प्रसाद खाडिलकर, डॉक्टर संजय मोरे ,दीपक तोरगळे ,पांडुरंग कोळी, अनिल केंगार, अजय भालेराव, शुभम मोरे, अनिकेत मोरे, रॉकी गायकवाड ,श्री रत्न तोरगळे, प्राजक्ता जाधव, विमल बनसोडे, कुमार गायकवाड ,अनिल रोकडे, निलेश बनसोडे आदी उपस्थित होते.