*राष्ट्रीय हरित सेनेच्या वसुंधरा पर्यावरण मंडळाचा इको फ्रेंडली पर्यावरण पूरक गड किल्ले बांधणी स्पर्धेचा अभिनव उपक्रम* *गड किल्ले यांची भावी पिढीला माहितीसाठी शिवकालीन किल्ला बांधणी स्पर्धा.....!*

*राष्ट्रीय हरित सेनेच्या वसुंधरा पर्यावरण मंडळाचा इको फ्रेंडली पर्यावरण पूरक गड किल्ले बांधणी स्पर्धेचा अभिनव उपक्रम* *गड किल्ले यांची भावी पिढीला माहितीसाठी शिवकालीन किल्ला बांधणी स्पर्धा.....!*


 करकंब /प्रतिनिधी  

रामभाऊ जोशी हायस्कूल येथील राष्ट्रीय हरित सेनेच्या वसुंधरा पर्यावरण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इको फ्रेंडली पर्यावरणपूरक गड किल्ले बांधणी स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.
 दिवाळीचा सण सर्वात मोठा सण असल्याने त्यातच कोरोना च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा उत्साह कमी होऊ नये यासाठी इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी या विद्यार्थ्यांसाठी इको फ्रेंडली पर्यावरणपूरक किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याबरोबरच स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गड किल्ल्याच्या बळावर बलाढ्य शत्रूला नामोहरण केले गड-किल्ल्यांची ओळख भावी पिढीला व्हावी आपल्या शूरवीरांच्या पराक्रमाची माहिती ज्ञात व्हावी या उद्देशाने गड किल्ले बांधणी स्पर्धा आयोजन केले होते.
    या गड किल्ले स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थी विद्यार्थिनी स्पर्धकांनीमोठ्या संख्येने सहभाग घेतला. सर्व सहभागी स्पर्धकांनी पाठवलेल्या किल्ल्यांच्या फोटो चे निरीक्षण करून तज्ञ परीक्षक दत्तात्रेय खंदारे .मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली क्रमांक 2, सागर थिटे. आदर्श कला शिक्षकआपटे उपलप प्रशाला पंढरपूर, नंदकुमार कुंभार आदर्श कला शिक्षक कन्या प्रशाला टेंभुर्णी यांनी उत्कृष्ट परीक्षण करून विजेते स्पर्धक ठरविले. यामध्ये प्रथम क्रमांक-देवराज दत्तात्रय पवार. इयत्ता आठवी, द्वितीय क्रमांक-विशाल रमेश वसेकर. इयत्ता नववी, तृतीय क्रमांक-रोहन अशोक कुंभार-इयत्ता नववी, तर उत्तेजनार्थ समर्थ अभिजीत टेके इयत्ता सहावी . यांनी पारितोषिक मिळवले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना लवकरच मान्यवरांच्या व परीक्षकांच्या उपस्थित आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे व विजेत्यांचे प्राचार्य हेमंत कदम व समन्वय सचिव एम के पुजारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.