*राजमुद्रा सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान जाधववाडी आयोजित दिवाळी निमित किल्ले बांधणी स्पर्धा संपन्न.*

*राजमुद्रा सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान जाधववाडी आयोजित दिवाळी निमित किल्ले बांधणी स्पर्धा संपन्न.*

करकंब/ प्रतिनिधी

:महाराष्ट्राच्या संस्कृतीच  संवर्धन आणि शिवकल्याण राजा तथा महाराष्ट्रातील किल्ल्यांचा सर्वांगीण परिचय व   गडसंवर्धन या उदात्त हेतूने आयोजित केलेली  किल्ले बांधणी स्पर्धा संपन्न झाली. या सांस्कृतिक मंडळाचे हे चौथे वर्ष असून या भव्य किल्ला बांधणी स्पर्धेस यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला.


करकंब /भोसे /शेवते /बार्डी (वाफळकरवस्ती )/ पांढरेवाडी /जाधववाडी, या गावातील मुलांनी किल्ले स्पर्धेत सहभाग घेतला होता 
यामघ्ये सिंहगड /पद्मदुर्ग/शिवनेरी /परांडा किल्ला /राजगड/सजन्नगड/ रायगड/ प्रतापगड हे किल्ले या वर्षीच्या स्पर्धेचे आकर्षण ठरले.
मुलांबरोबर त्याच्या पालकांमघ्ये पण उत्साही वातावरण होते.
सर्व किल्ले घरी जाऊन पाहणी केली.. वेगवेगळ्या खुबी/वेगवेगळे संदेश /देऊन सामाजिक बांधिलकी पण जपण्याचा प्रयत्न करण्यात आला..
किल्ले इतके अप्रतिम होते कि परिक्षकांना  पण प्रश्न निर्मान झाला होता.. कोणाला नंबर द्यायचे... परीक्षक म्हणुन


१)विश्वास फाळके (सर)
२)विजय जाधव(करकंब)
3)ज्ञानेश्वर कुंभार(करकंब)
जयवंत वसेकर( बार्डि)
प्रथम तीन क्रमांकान बक्षिस+ सन्मान चिन्ह + प्रमानपञ उत्तेजनार्थ साठी  थोर विचारवंत पुरुषांची पुस्तके. आणि सन्मानचिन्ह सन्मानपत्र  दिले.. जाईल आणि सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना  सन्मानपत्र दिले जाईल...
लवकरच बक्षिस वितरण कार्याक्रम घेण्यात येणार आहे..
स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना मोफत अकलूज दर्शन (शिवसृष्टी किल्ला) असे राजमुद्रा परिवाराचे अध्यक्ष सिताराम धुमाळ जाधव वाडी यांनी सांगितले.