*सक्तीने बचतगट वसुली केल्यास मनसेशी गाठ:दिलीप धोत्रे* *कोरोनामुळेआर्थिक हतबल झालेल्या बचतगट महिलांना फिरून एकदा मनसेकडून दिलासा*

आष्टी/प्रतिनिधी
गेल्या दिड वर्षापासून संपूर्ण जग लाॅकडाऊन होते .त्यामुळे अनेकांचे संसार उध्दवस्त झाले असुन,गोरगरीब लोकांनी बचत गटाकडून कर्ज काढले आहेत.पण सध्या हाताला काम नसल्याने कर्ज भरण्यास मागेपुढे होत असल्याने बचत गटांकडून सक्तीची वसूली करण्यात येत आहे.जर ही सक्तीची वसूली थांबवली नाही तर बचत गट चालविण्या-यांची मनसेशी गाठ असल्याचा ठणकावून ईशारा दिल्यामुळे मनसे नेते दिलीप धोञे यांच्याकडून फिरून एकदा आर्थिक अडचणीत सापडलेल्या बचतगट महिलांना दिलासा मिळाला आहे.
आष्टी येथे नवराञ उत्सवात महराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.त्या रांगोळी स्पर्धेचे बक्षिस वितरण व गोरगरीब 200 कुटूंबीयांना ब्लॅकेट चे वाटप आज मंगळवार दि.9 रोजी दुपारी एक वाजता सायकड गल्ली येथील जगदंबा देवी मंदिरात आयोजित करण्यात आला होता.यावेळी धोञे बोलत होते.याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे,महिला जिल्हाध्यक्ष वर्षा जगदाळे,वैभव काकडे,सोपान मोरे,जुबेर सिध्दीकी,सतिश शिंदे,कुमार उगले,राजू खेडकर,सुरज गिते,समिर पाचपुते,लहू भवर,महेश अनारसे यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना दिलीप धोञे म्हणाले,सध्या गोरगरीब जनतेचे जगणे मुश्कील झाले असून,त्यांनी बचत गटांकडून घेतलेले कर्ज वेळेवर भरणे शक्य होत नाही पण बचत गटावाले हे त्यांच्याकडून वसूली सक्तीचे करीत असल्याचे प्रकरणे समोर आले आहेत.गोरगरीब लोकं पैसे बुडवित नसतात त्यांना सुट देऊ नका व सवलत द्या नसता तुमची मनसेशी गाठ असल्याचा इशाराही त्यांनी दिला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक करतांना मनसे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर म्हणाले,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून शहरात विविध कार्यक्रम आम्ही राबवत असतोत आज गेल्या सात वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतक-यांना मोफत बियाणे वाटप करत आहोत.मागील महिन्यात आम्ही सांगली,सातारा येथील पुरग्रस्तांना सुध्दा जाऊन मदत केली आहे.तसेच आजही जवळपास दोनशे कुटूंबीयांना ब्लकीट चे वाटप केले अहे.यापुढे आम्ही राजसाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहविण्याचे प्रामाणिकपणे काम करणार असल्याचेही दरेकर यांनी सांगीतले.