*स्व. भारतनानाच्या भूमिकेतून वाटचाल करण्यासाठी या निवडणुकीतही साथ राहुद्या* *डॉ प्राणिताताई भालके यांचे विठ्ठलच्या निवडणुकीसाठी आवाहन*

पंढरपूर/प्रतिनिधी
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या निमित्ताने भालके गटाच्या वतीने डॉ प्राणिताताई भालके यांनीही आपल्या प्रचार दौऱ्यास सुरुवात केली आहे. यामध्ये त्यांनी गावोगावी प्रचारसाठी भेटी चालू केल्या आहेत. यामध्ये सौ भालके यांनी स्व भारतनाना भालके यांच्या भूमिके प्रमाणे यापुढीलही कारभार करून गतवैभव प्राप्त करू असे अस्वासन देत, या निवडणुकीतही साथ राहू द्या असे आवाहन केले आहे.
तालुक्यातील शिरगांव,एकलासपुर, सिद्धेवाडी,चिंचुंबे,तावशी तनाळी,तपकिरी शेटफळ, खर्डी येथील सभासद शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन वरील गावातील सभासदांना आवाहन केले आहे.
आगामी काळात कारखाना चालू करून परत स्व.नानांनी जी सभासद शेतकरी वर्गाला अडचणी च्या काळात मदत केली कारखान्याची क्षमता वाढवून वेगवेगळे प्रकल्प उभा केले उच्च दर दिला त्याच भूमिकेतून इथून पुढच्या काळात वाटचाल करून विठ्ठल परिवार म्हणून जिल्ह्यात जो राजकीय दबदबा आणि ताकद जी नानांनी उभी केली ती परत मिळवून आपण वाटचाल करु असा डॉ.सौ.प्रणिताताई भगिरथ भालके यांनी विश्वास दिला.डॉ.सौ.प्रणिताताई भगिरथ भालके यांनी आज शिरगांव, एकलासपुर, सिद्धेवाडी चीचुंबे, तावशी, तनाळी, तपकीरी शेटफळ, खर्डी या गावामध्ये सभासद यांच्या गाठी भेटी घेतल्या त्यांच्या सोबत गोकुळ दादा जाधव, माजी संचालक,दिपक सदाबसे माजी संचालक त्या भागातील सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.