*लक्ष्मणतात्या धनवडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*

पंढरपूर /प्रतिनिधी
*पंढरपूर-मंगळवेढा, माढा-करमाळा, मोहोळ या विधानसभा क्षेत्रातील आपल्या समाजाभिमुख नेतृत्वामुळे असंख्य जनसंपर्क, तसेच उजणी धरणग्रस्तांसाठी असंख्य आंदोलने, मोर्चा, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत जिवाळ्याचे नातं असणारा, शेतकरी,शेतमुजर,गोर गरीबांच्या न्याय हक्कासाठी लढणारा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे असे भारतीय जनता पार्टी चे राज्य कार्यकारणी सदस्य, तथा पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे -संचालक, कृषीउत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती, भाजपा अनुसूचित जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष मा.श्री. लक्ष्मणराव(तात्या) धनवडे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
बाल वयातील प्राथमिक शिक्षण घेताना मिळालेले संस्कार तरुणपणी जीवन जगण्यासाठी खूप उपयुक्त असते. त्यामुळे बालकांना शिक्षण मिळावे म्हणून तात्या सदैव प्रयत्नशील असतात. या बालकांना सर्व भौतिक सुविधा मिळाव्यात म्हणून आजच्या वाढदिवसानिमित्त सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्कूल वाटप करण्यात आले. अंगणवाडीतील मुले ही गणवेशापासून वंचित होते ते दिसताच सर्वच अंगणवाडीच्या मुलांना गणवेश वाटप करण्यात आला. अंगणवाडीतील चिमुकल्यांना रुचकर व स्वादिष्ट खाऊ बनवता यावा म्हणून सर्व अंगणवाड्यांना पाच लिटर क्षमतेचे कुकर देण्यात आले. त्यांना धान्य साठवून ठेवता यावे म्हणून धान्य साठवण पेट्या वाटप करण्यात आले. पंढरपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील निराधार आजी आजोबांना जेवणाची पंगत देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. तालुक्यातील अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना पोष्टिक खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच गहिनाथ तात्या चव्हाण, माजी सरपंच विठ्ठल माने,बळवंत धनवडे, विष्णू माने दत्तात्रेय मस्के, श्रीधर कोळेकर,विजय कोळेकर, मुकुंद गाडगे,नितीन गुंड,भाऊसाहेब माने,बापू वसेकर, संतोष चव्हाण,माऊली मस्के, बापू कोले,ज्ञानेश्वर लवंड, नारायण गुंड,ज्ञानेश्वर बर्डे,बाळासाहेब बनसोडे,दत्तात्रय बनसोडे,पोपट पाटील, अमोल हाडमोडे,अण्णा हजारे, पांडुरंग नलवडे,नारायण गुंड, नवनाथ नलवडे, सुनील माने,मारुती चव्हाण, सचिन भडकवाड, दादा जानकर, बापू कोळेकर,संदीप हिंगमिरे, कुबेर सोनवर,नितीन घाडगे, बाळासाहेब सुतार,तानाजी वसेकर यांचे सह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.