*आता स्वाभिमानी ही उतरली "विठ्ठल"च्या रिंगणात..* *सात अर्ज दाखल करत स्वाभिमानीची निवडणुकीच्या रणधुमाळीत उडी..*

*आता स्वाभिमानी ही उतरली "विठ्ठल"च्या रिंगणात..*   *सात अर्ज दाखल करत स्वाभिमानीची निवडणुकीच्या रणधुमाळीत उडी..*

पंढरपूर/प्रतिनिधी


            विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे वारे सध्या तालुक्यात वाहत आहेत. विविध गटांमध्ये सध्या ही निवडणूक होईल अशी चिन्हे आहेत. अशातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील या निवडणुकीत उडी घेतली आहे.मंगळवारी स्वाभिमानीकडुन विठ्ठल साठी सात अर्ज दाखल करण्यात आले. यामुळे निवडणूक आणखी रंगतदार होणार आहे. 

                             *स्वाभिमानीकडुन अनुक्रमे विष्णू सदाशिव बागल,अरुण शंकर शिंदे-पाटील,पंजाब कल्याण भोसले,तानाजी विष्णू बागल,साहेबराव श्रीरंग नागणे,रायाप्पा धोंडीबा हळनवर,सुभाष पाटील खेड भाळवणी आदींनी आपला उमेदवारी अर्ज यावेळी दाखल केला.*

                *विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा सभासदांचा राजवाडा आहे तो चालु झाला पाहिजे,सभासदांची थकीत ऊसबिले व कामगार यांच्या पगारी वेळेत मिळाल्या पाहिजेत यासाठी गेले दोन वर्षांपासून स्वाभिमानीकडुन लढा देत आहोत.संस्था टिकली पाहिजे याच हेतुने येत्या निवडणुकीत स्वाभिमानी उतरणार आहे व उर्वरित अर्ज देखील लवकरच भरू अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल यांनी दिली.*
                         

                  *कारखान्याचे गतवैभव पुन्हा मिळाले पाहिजे,सभासदांचे झालेले हाल आणि त्रास या असंतोषाचे जनक होत त्यांना न्याय मिळाला पाहिजे,कारखाना योग्य लोकांच्या हातात आला पाहिजे ही भुमिका आमची असुन आम्हाला विठ्ठल साठी लढणाऱ्या सर्वच प्रमुख गटांकडून आघाडीबाबत प्रस्ताव आहेत याबाबत चर्चा करू. जो कोणता गट संघटनेच्या शेतकरी हिताच्या तत्त्वाशी बांधिलकीची भुमिका घेईल त्या गटासोबत जाण्याबाबत आम्हीही निश्चित विचार करू असे मत यावेळी तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी व्यक्त केले..*
यावेळी विष्णुभाऊ बागल,हनुमंत पाटील, युवा आघाडी राज्य प्रवक्ता रणजित बागल,युवाआघाडी जि.कार्याध्यक्ष मनोज गावंधरे,संपर्कप्रमुख रायाप्पा हळणवर,सचिन आटकळे,संतोष सुर्यकांत बागल,बाहुबली सावळे,हरी रानगर,देविदास साळुंखे,बापुराव शिंदे, यांसह कार्यकर्ते उपस्थित होते