*जि. प. प्रा. शाळा कान्हापुरी येथे पालखी दिंडी सोहळा उत्साहात साजरा*

*जि. प. प्रा. शाळा कान्हापुरी येथे पालखी दिंडी सोहळा उत्साहात साजरा*

करकंब/ प्रतिनिधी :-
जि. प. प्रा. शाळा कान्हापुरी ता .पंढरपूर  येथे आषाढी एकादशी निमित्ताने शैक्षणिक आणि पर्यावरण पूरक संदेश देण्यासाठी दिंडी सोहळ्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले . यामध्ये विठ्ठल, रुक्मिणी, भालदार, चोपदार, वारकरी इत्यादी वेशभूषा करून मुले सहभागी  झाली.
दिंडीची सुरुवात पालखी पूजन, आरती इत्यादी कार्यक्रमाने करण्यात आली. गावातून दिंडी फेरीच्या वेळी घरोघरी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा महिलांनी केली. 80 वर्षाचे आजी आजोबा सह अनेक स्त्री-पुरुष दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणी भेटल्याचा आनंद गावकऱ्यांना झाला.
गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा आरती करून गावामध्ये हनुमान मंदिरासमोर गोल रिंगण केले .त्यावेळी फुगडी, वारकऱ्यांचे खेळ घेण्यात आले. महिला, शिक्षक भगिनी, ग्रामस्थ व शिक्षक यांनी यामध्ये सहभाग घेतला. शाळेपुढे रिंगण सोहळा घेण्यात आला . सर्व बाळ गोपाळांना खाऊ वाटप करण्यात आले व पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली. सदर दिंडी पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी गावातील भजनी मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.