*पंढरपूर तालुक्यातील कृषीपंप धारक शेतकऱ्यांना दिलासा..* *युवा नेते अभिजीत पाटील यांच्या मागणीला यश* 

*पंढरपूर तालुक्यातील कृषीपंप धारक शेतकऱ्यांना दिलासा..*  *युवा नेते अभिजीत पाटील यांच्या मागणीला यश* 

पंढरपूर: प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पंपाचा विद्युत पुरवठा महावितरणने पूर्णपणे बंद केला होता त्यासाठी आज युवा नेतृत्व अभिजीत आबा पाटील यांनी पंढरपूर येथील महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता श्री.हेमंत कासार यांना निवेदन देऊन तालुक्यातील शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली होती. 

या चर्चेदरम्यान पिण्याच्या पाण्यासाठी तसेच जनावरांसाठी दोन तास विद्युत पुरवठा सुरू करण्याची विनंती केली होती या विनंतीस सकारात्मक प्रतिसाद देत महावितरणचे कासारसाहेब यांनी  पिण्याच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी दोन तास विद्युत  पुरवठा सुरू करणार असल्याचे सांगितले.तसेच शेतकऱ्यांना वीज बील भरण्यासाठी महावितरणच्या योजनेचा लाभ घेण्याची विनंती शेतकऱ्यांना श्री. अभिजीत पाटील यांनी केली. 

गेल्या चार-पाच दिवसांपासून कुठलीही नोटीस किंवा पूर्व सुचना न करता महावितरणने वीज पुरवठा खंडीत केला होता. एका बाजूला कोरोनाच्या महामारीमुळे व पंढरपूर तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. गेल्या हंगामातील गाळपास गेलेल्या ऊसाचे बिल कारखान्यांनी दिले नाही. कोरोनामुळे शेतीमालाला भाव नाही दुधाला दर नाही अशा परस्थीतीत शेतीपंपाचा विज पुरवठा बंद झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचा आवाज म्हणून अभिजीत पाटील समोर आले असून त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. 

यावेळी पोहोरगावचे मा.सरपंच सिद्धनाथ गायकवाड, धनंजय बागल, सर्जेराव घाडगे, ज्ञानेश्वर महाराज, समाधान जावळे, नितीन पवार, किरणराज घोडके, गणेश ननवरे, आणणासो डूबल, आदी उपस्थित होते.