*कै. भिमराव  महाडिक यांची २६ व्या पुण्यतिथी  विविध उपक्रमांनी साजरी*   *१०१ रक्तदान तर १२० लसीकरण*

*कै. भिमराव  महाडिक यांची २६ व्या पुण्यतिथी  विविध उपक्रमांनी साजरी*   *१०१ रक्तदान तर १२० लसीकरण*


तारापूर/प्रतिनिधी
भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै.पैलवान भिमराव महाडिक यांची   २६ वी पुण्यतिथी आज रक्तदान, कोविड प्रतिबंधक लसीकरण व धार्मिक कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली.
पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त कारखाना साईटवर  मंगलताई महाडीक यांच्या प्रमुख उपस्थितीत कै .भीमराव महाडिक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप आणि कार्यकारी संचालक सुर्यकांत शिंदे यांच्या हस्ते सकाळी  भिमरावदादा महाडिक यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विनोदाचार्य ह भ प प्रकाश साठे महाराज नगरकर यांचे सुश्राव्य व प्रबोधनपर कीर्तन झाले .  
 यावेळी अक्षय रक्त पेढी सोलापूर व पंढरपूर ब्लड बॅक पंढरपूर यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबारात  १०१ जणानी रक्तदान केले तर १२० नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली . यावेळी मंगलताई महाडिक, उपाध्यक्ष सतिश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे,जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे, शिवाजीराव गुंड, संचालक रामहरी रणदिवे, बिभीषण वाघ,अनिल गवळी,चंद्रसेन जाधव, गणपत पुदे, दादासाहेब शिंदे, तुषार चव्हाण,पवन महाडीक,पांडुरंग ताटे, राजाराम बाबर, भारत पाटील, सुनिल चव्हाण, किसन जाधव, सुरेश सावंत, डॉ.किल्मिशे,संग्राम चव्हाण, भाऊसाहेब जगताप, डॉ.सागर जाधव, डॉ.उदय पाटील,
डॉ.जयवंत देशमुख, डॉ.चंद्रकांत गुंड,कल्याण कुलकर्णी आदिंसह भीमाचे संचालक मंडळ व भीमा  परिवारातील प्रमुख नेतेगण व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .