*अन्यथा... आमदार बबनदादा शिंदे च्या दारात आंदोलन करणार-प्रभाकर भैया देशमुख.* *महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन.* *बनावट राज्यकर्त्यांचा सुळसुळाट*

करकंब /प्रतिनिधी:
-करकंब व बार्डी येथील वीस ते पंचवीस शेतकऱ्यांचं द्राक्ष शेतीच नुकसान झालं.. या भागात चार ते पाच आमदार आहेत. कुठल्या आमदाराला घाम आला. आमदार- बबनदादा शिंदे यांना 30 ते 40 वर्षाचा अनुभव आहे. दादाकडे तक्रार केली होती ना. मत मागायला निरोप न देता मतदार दिसतात. मात्र तुम्हाला घटना घडली की पेपर वाचून भेटायला तरी मनाने यायचं.. पवार साहेबांचा उजवा हात ..अजित दादाचा डावा हात... अरे काय करायचं इथं आम्ही शेतकरी ...पोटांनी मारायला लागलो. काय करता अधिवेशनात... तुमची जबाबदारी नाही का...? लोकप्रतिनिधी म्हणून या शेतकऱ्यांची जबाबदारी काय स्वीकारली. जर या शेतकऱ्यांना एक तारखेपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही तर आमदार - बबनदादा शिंदे यांच्या दारात आंदोलन करण्यात येईल असा परखड इशारा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष - प्रभाकर भैया देशमुख यांनी दिला.
करकंब येथील ओंकार कृषी केंद्र आणि मॉर्डन कंपनी व संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात करकंब येथील जळवली चौक येथे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळावी .आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. यासाठी भव्य रस्ता रोको आंदोलन महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी प्रभाकर भैया देशमुख बोलत होते. शेतकरी आंदोलनास बहुसंख्य शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रभाकर भैया देशमुख यांनी या राज्यात आणि सोलापूर जिल्ह्यात बनावट राज्यकर्त्यांचा सुळसुळाट असून शेतकऱ्यांनी वेळीच सावध व्हावे. महाविकास आघाडीचे सरकार असताना दीड वर्षात चार पालकमंत्री बदलले. आता एकनाथ शिंदे -फडवणीस सरकारच्या काळात या जिल्ह्यात भाजपाचे सात आमदार असूनही नगर जिल्ह्यातील आमदार आमच्या डोक्यावर आणून बसवला. हा पठया महिना- महिना सापडत नाही. त्यामुळे यापुढील काळात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी अधिक आक्रमकपणे न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून जर करकंब व बार्डी येथील नुकसानग्रस्त द्राक्ष शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही मिळाल्यास आमदार बबनदादा शिंदे यांच्या दारात आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी शेतकरी आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला.