*करकंब पोलिसांनी संकटात जोपासलेल्या माणुसकीचा करण्यात आला सन्मान*

करकंब/प्रतिनिधी
करकंब पोलीस ठाण्याचे पीएसआय महेश मुंडे व सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदार सिरमा गोडसे पोलीस हवालदार करकंब पोलीस ठाणे यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोविड योद्धा म्हणून पुरस्कार देण्यात आला
करकंब शहरालगत असणारे व करकंब पोलीस ठाणे हद्दीत येणारे मौजे सांगवी तालुका पंढरपूर येथील 60 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.त्याच्या घरातील सर्व लोक पॉझिटिव असल्याने ते विलगीकरण सेंटर पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल असल्याने त्यांच्या अंत्यविधी करता कोणी इसम पुढे येत नसल्याने करकंब पोलीस ठाण्याचे पीएसआय महेश मुंडे व हवालदार सिरमा गोडसे कॉन्स्टेबल घुंगे यांनी पुढाकार घेऊन सदर त्यांचा अंत्यविधी त्यांचे जवळचे नातेवाईक सून जावई यांच्या उपस्थितीत करण्यात आला या अधिकाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचे राज्यभरात कौतुक झाले व 15 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे साहेब व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या उपस्थित जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना पुरस्कार देण्यात आला