*ऑपरेशन परिवर्तनातून पारधी समाजात होतेय, तेजस्वी वाटचाल...*.! *दारू काढणारे व विकणारे हात; आता किराणा, शेळीपालन,अन दुग्ध व्यवसायाकडे*   *करकंब पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी ऑपरेशन परिवर्तन च्या माध्यमातून केले मनपरिवर्तन.*

*ऑपरेशन परिवर्तनातून पारधी समाजात होतेय, तेजस्वी वाटचाल...*.!  *दारू काढणारे व विकणारे हात; आता किराणा, शेळीपालन,अन दुग्ध व्यवसायाकडे*    *करकंब पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी ऑपरेशन परिवर्तन च्या माध्यमातून केले मनपरिवर्तन.*

करकब/ प्रतिनिधी

 ऑपरेशन परीवर्तन मोहीम अंतर्गत करकंब पोलीसांचे पुढाकारातून आरोपींनी किराणा दुकान, शेळी पालन, दुग्धव्यवसाय, बचत गट माध्यमातून केले स्वतःमध्ये परीवर्तन

मा.पोलीस अधिक्षक सो  तेजस्वी सातपुते मॅडम व अपर पोलीस अधिक्षक श्री अतुल झेंडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सो पंढरपुर विभाग श्री विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली ऑपरेशन परीवर्तन मोहीम अंतर्गत करकंब पोलीस ठाणेची हददीमध्ये अवैध हातभटी धंदयावर कारवाई करणेबाबत निर्देश दिलेले होते. त्याप्रमाणे करकंब पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहा पोलीस निरीक्षक/ निलेश तारु यांनी पोउपनि/महेश मुंडे व पोउपनि/ अजित मोरे यांचे दोन पथक तयार करून पाठपुरावा करणेकरीता आदेश देण्यात आलेले होते

.

करकंब पोलीस ठाणे कडील विविध गावामध्ये ऑपरेशन परीवर्तन अंतर्गत हातभट्टी दारु निर्मिती व हातभटटी विक्री करणारे यांचेवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आलेले होते व त्यांना इतर व्यवसायक करण्याकरीता ऑपरेशन परीवर्तन मोहीम अंतर्गत आवाहन करण्यात आलेले होते त्याप्रमाणे आज रोजी सपोनि / निलेश तारु यांचे अधिपत्याखाली देशमुख पटटा करकंब येथे जावुन छापा टाकला असता त्याठिकाणी काहीही मिळुन आले नाही. त्याठिकाणी आशाबाई व्यंकट काळे व व्यंकट भालचंद्र काळे यांनी किराणा दुकान काढून स्वतःचा व्यवसाय सुरु केल्याचे सांगीतले. त्याठिकाणी सपोनि/निलेश ज्ञतारु, पोउपनि/ महेश मुंडे व पोउपनि/अजित  मोरे यांनी पारधी समाजाच्या कुटुंबियांची भेट घेवून आशाबाई काळे यांचा आदर्श घेवून  इतर नातेवाईक यांनाही छोटा-मोठा व्यवसाय सुरु करा तसेच शेतीस पुरक जोडव्यवसाय करणेबाबत सुचना दिल्या.

तसेच सपोनि / निलेश तारु यांचे अधिपत्याखाली भारतनाला करकंब येथेही जावून छापा टाकला असता त्याठिकाणीही तेथील लोकांनी हातभट्टी दारु निर्मितीचा अवैध धंदा बंद केल्याचे दिसून आले. तसेच त्याठिकाणी जावुन त्यांचेही प्रबोधन झाल्याने त्यांनीही शेतीला पुरक असा शेळीपालन, दुग्धव्यवसाय सुरु केल्याची माहीती दिली. त्याप्रमाणे वंदना कुमार काळे  व कुमार हरी काळे यांनी त्याठिकाणच्या महीलांचा ग्रुप तयार करुन बचतगट सुरु केल्याची माहीती दिली. बचत गटाच्या माध्यमातुन चमाबाई उत्तम काळे हिने १० शेळया घेवुन शेळीपालन व्यवसाय सुरु केल्याची माहीती दिली. तसेच,धनश्री पप्पु काळे व पप्पु हरी काळे यांनीही बचत गटाच्या माध्यमातुन १० शेळयां व एक म्हैस घेवून शेळी पालन व दुग्धव्यवसाय सुरु केल्याची माहीती दिली. तसेच यापुढे अवैध हातभट्टी दारु निर्मिती व विक्री करणार नसल्याचे सांगीतले. सदरच्या भारतनाला याठिकाणी यापूर्वी तिन गुन्हे दाखल असून त्यामध्ये दोन आरोपी अटक असून त्यांना अदयाप जामीन झाला नसल्याने त्यांच्यामध्ये ऑपरेशन परीवर्तन मोहीमेचा चांगला फरक पडलेला दिसून आलेला आहे. त्यांना आणखीन मार्गदर्शन करून अवैध हातभट्टी निर्मित न करणेबाबत प्रबोधन करण्यात आले.

सदरच्या कारवाई करकंब पोलीस ठाणेचे प्रभारी मा.सहा. पोलीस निरीक्षक / निलेश तारु यांचे अधिपत्याखाली, पोउपनि/महेश मुंढे व पोउपनि/अजित मोरे यांचे दोन पथाकामध्ये पोलिस हवालदार / २४७ हरीहर पोहवा/१८९७ जाधव, पोलीस नाईक /१८८३ वाघमारे, पोना / २६ भोसले, पोलिस कॉ/ १५१० फुगे, महीला पोकॉ/ २१५९ माने व ४ महीला होमगार्ड व ०४ पुरुष होमगार्ड यांनी कामगीरी केलेली आहे.