देशात पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभारणारे चेअरमन अभिजीत पटिल उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या भेटीला

देशात पहिला ऑक्सिजन प्रकल्प  उभारणारे चेअरमन अभिजीत पटिल उपमुख्यमंत्री  ना.अजित पवार यांच्या भेटीला

पंढरपूर :प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.श्री.अजित दादा पवार साहेब यांनी धाराशिव साखर कारखान्याच्या *ऑक्सिजन प्रकल्प उदघाटन व्हर्च्युअल* प्रसंगी भेटण्यास युवा नेते धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना सांगितले असता नियोजित वेळेत आज मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री दालनात अभिजीत पाटील यांनी भेट घेतली. 

यावेळी धाराशिव साखर कारखान्यावरील ऑक्सिजन प्रकल्पाची संपुर्ण माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेऊन राज्यातील इतर कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती करण्याबाबत चर्चा करण्यात आली व राज्याची ऑक्सिजनची मागणीनुसार साखर कारखान्यातून ऑक्सिजन निर्मिती पुर्ण होऊ शकेल यावर सविस्तर चर्चा चेअरमन अभिजीत पाटील यांची झाली.