*उद्या शनिवारी करकंब येथे मिळणार  पंधराशे लसीचे डोस!* *कर्तव्यतत्पर सरपंच तेजमाला पांढरे यांच्या पाठपुराव्याने जनतेला दिलासा*

*उद्या शनिवारी करकंब येथे मिळणार  पंधराशे लसीचे डोस!*  *कर्तव्यतत्पर सरपंच तेजमाला पांढरे यांच्या पाठपुराव्याने जनतेला दिलासा*

करकंब /प्रतिनिधी:

करकब हे पंढरपूर तालुक्यातील लोकसंख्येने सर्वात मोठे गावातून व्यापार उद्योग शेती फळबाग याच बरोबर शेती पूरक व्यवसाय याबाबत अग्रगण्य असे गाव असून करकंब हे गाव मोठी बाजारपेठ आहे. करकबची लोकसंख्या पाहता करकंब ला जास्तीत जास्त लसीकरण पुरवठा करण्याची गरज होती, याची सातत्याने ग्रामपंचायत च्या माध्यमातून सरपंच तेजमाला शरदचंद्र पांढरे यांनी यापूर्वी मागणीही केली होती . 
 करकंब ला शासन स्तरावरून गेल्या आठ दिवसापासून सातत्याने लसीकरण पुरवठा होत आहे. करकंब येथील विशेषता किराणा, जनरल स्टोअर्स, हार्डवेअर, सलून दुकानदार, कापड व्यापारी, स्टील, फर्निचर तसेच भाजी विक्रेते, फळविक्रेते हॉटेल व्यवसायिक व इतर व्यवसायिकयांनी उद्याच्या लसीकरणा मध्ये सहभाग घ्यावा  व स्वतःचे लसीकरण करून घ्यावे. तसेच शेती पूरक व्यवसायिक, कृषी शेतीशी निगडित असलेले व्यवसायिक व वाडी वस्तीवरील शेतकरी बांधव, शेतमजूर, महिला युवक वर्गांनी लसीकरण करावे.
  यापूर्वी या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून लसीकरण वाढवण्याची मागणी केल्याने मोठ्या प्रमाणात लसीकरणाला वेग आला आहे. आज पर्यंत सुमारे करकंब येथे सहा ते सात हजार नागरिकांनी सुरक्षितता म्हणून लसीकरण करून घेतलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषता व्यापाऱ्यांनी उद्याच्या लसीकरणा मध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊन लसीकरण करावे असे आवाहन सरपंच तेजमाला शरदचंद्र पांढरे व उपसरपंच आदिनाथ देशमुख यांनी केले आहे.
  करकंब येथे उद्या पंधराशे कोविड च्या लसीचे डोस उपलब्ध झाले असून, जास्तीत जास्त प्राधान्याने व्यापारी वर्गाने लसीकरण करून आपला व्यवसाय करावा. शासनाच्या नियमाचे पालन करावे.
   या लसीकरण मोहिमेमध्ये करकबग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तुषार सरवदे व त्यांचे सहकारी तसेच आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक हे परिश्रम घेत आहेत.