*नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीजच्या वतीने, महापुरुषांच्या जयंती महोत्सवनिमित्त विविध कार्यक्रम* *उद्या होणार चर्चासत्र व मान्यवरांना पुरस्कार सोहळा !*

पंढरपुर:-राष्ट्रमाता जिजाऊ, विद्येची आराध्य देवता सावित्रीमाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई, छत्रपती शिवाजी महाराज, संतशिरोमणी रविदास महाराज या महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि बौध्द,दलित आदिवासी मागासवर्गीयांची स्थिती या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव सोहळा, जिजाऊ-सावित्री-रमाई पुरस्कार तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पुरुषांचा गौरव सोहळा फुले -शाहू -आंबेडकर-अण्णाभाऊ पुरस्कार, विविध सामाजिक विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे.या उद्या शुक्रवारी २५ फेब्रुवारी रोजी या महोत्सवाचे उद्घाटन अँड.केवल उके,(महासचिव, एनडीएमजे ) व वैभव गिते,सचिव, एनडीएमजे)यांचे हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी अँड.बि.जी.बनसोडे, उच्चन्यायालय, वरिष्ठ विशेष सरकारी वकिल ,विधीज्ञ हे भुषविणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विक्रम कदम, उपविभागीय पोलिस अधिक्षक, आनंद चंदनशिवे माजी नगरसेवक,प्रशांत काळे ,गटविकास अधिकारी, अँड.अमोल सोनवणे,अँड. बापूसाहेब शिलवंत,सुमित सावंत,विकास धाईंजे,दादासाहेब जाधव,जगदिप ठिपके,पी.एस.कांबळे, पंचशिलाताई कुंभारकर,अँड. वैभव धाईंजे, अनिकेत मोहिते,शिवराम कांबळे, बी.पी.लांडगे,अँड. सुमित निकाळजे अंपल खरात हे उपस्थित रहाणार आहेत.याप्रसंगी माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले, उज्वलाताई भोसले,प्रणितीताई भालके,शैलाताई गोडसे,माधुरीताई धोत्रे, पत्रकार अभिराज उबाळे,जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे,अँड.किर्तीपाल सर्वगोड,श्रीकांत चव्हाण सर,क्रृष्णा वाघमारे,विनोद जाधव, संजय झेंडे,मोहन दिपके,दत्ता कांबळे, दिपक चंदनशिवे, नेताजी वाघमारे,अँड. अर्चना मस्के आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
तरी सकाली .११ वाजता हाँटेल पंढरपूर येथील जुना बसस्थानक समोरील विठ्ठल इन सभागृह येथे संपन्न होणाऱ्या या सोहळ्यास सर्वानी रहावे, असे आवहान जिल्हा अध्यक्ष पंकज काटे, जिल्हाउपाध्यक्ष धनाजी शिवपालक,जिल्हा प्रसिध्दीप्रमुख येताळा खरवडे ,युवानेते रोहित एकमल्ली, आदीने केले आहे.