*करकंब शिवकालीन तलाव व पूर्व भागाच्या पाणी प्रश्नासंदर्भात नामदार जलसंपदामंत्री जयंत पाटील त्यांची करकंब ला देणार धावती भेट,.......!*

*करकंब /प्रतिनिधी
करकंब येथील शिवकालीन असलेल्या पाझर तलावास यापूर्वी सत्तर वर्षाच्या कालखंडानंतर माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी भेट देऊन याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यानंतर करकंब येथील अजित्सिंह देशमुख मित्र मंडळाचे कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून याबाबत वारंवार पाठपुरावा केला होता. याबाबत माढा -पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बबन दादा शिंदे यांच्या माध्यमातून देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्याशी प्रत्यक्षात भेट घेऊन या राज्याचे लोकप्रिय जलसंपदामंत्री नामदार जयंत पाटील यांच्याशी वारंवार पणे चर्चा करून समक्ष भेट घेऊन या शिवकालीन तलावास संदर्भात आणि पूर्व भागातील दुष्काळासंदर्भात चर्चा करून सर्वेक्षण करण्यासाठी व भेट देण्याचे आमंत्रण दिले होते. त्याच संदर्भात अजित्सिंह देशमुख मित्रमंडळाने या शिवकालीन तलावाचे एल सेक्शन चे नकाशे सर्वेक्षण केलेले उद्या दिनांक 21रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील या शिवकालीन पाझर तलावात संदर्भात व पूर्व भागाच्या पाणी संदर्भात नेमतवाडी चौक येथे धावती भेट देणार असल्याचे अजित्सिंह देशमुख मित्र मंडळाच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी अशोक देशमुख, मिथुन मिथुन चंदांशिवे (सर), संतोष शिंदे, नितीन दुधाळ, प्रकाश काका नागरस, विजयसिंह निकम, रामचंद्र सलगर, महेश गुजरे, शैलेश जवारे, सुधीर मगदूम, राजेंद्र खारे, धनाजी लोकरे, हनुमंत भंडारे, अमोल चेडे, विष्णू चेडे, भैरवनाथ वाफळकर या टीमचे सर्व सहकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.*